Whale Vomit: ठाण्‍यात व्हेल माशाची ३ कोटींची उलटी हस्तगत; दोघांना अटक

जांभळी नाक्यावर विक्रीसाठी आले होते दोघे; २ किलो ७२० ग्रॅम पदार्थ ठाणे गुन्हे शाखेने ताब्यात घेतला
Whale Vomit Thane
Whale Vomit ThanePudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: व्हेल माशाची २.७२ कोटीच्या उलटीची विक्री करण्यासाठी ठाण्याच्या जांभळी नाक्यावर आलेल्या एका महिला आणि पुरुषाला ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने अटक केली.

त्यांच्याकडून २ किलो ७२० ग्राम वजनाची उलटी हस्तगत करण्यात आली. दोघांच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

Whale Vomit Thane
Mahad Car Accident: मुंबई-गोवा महामार्गावर टायर फुटून कार उलटली; अपघातात एकाचा मृत्यू, चौघे जखमी

ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकातील कर्तव्यावरील पो.ह. गणेश बडगुजर याना त्यांच्या खबऱ्याद्वारे आलेल्या गोपनीय माहितीची खातरजमा करीत विपिनी अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ आक्टोबर रोजी ६ वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या हायलॅन्ड रेसिडेन्सी लॉज जवळ, जांभळी नाका, ठाणे पश्चिम या ठिकाणी सापळा रचून मयुर, रा. कोल्हापूर, तसेच मिनाक्षी, रा. सिंधुदुर्ग याना अटक केली.

Whale Vomit Thane
Kal Kumbhe Project: काळ-कुंभे जलविद्युत प्रकल्प बारगळण्याच्या मार्गावर; आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण

त्यांच्या अंगझडतीत त्यांच्याकडे २ किलो ७२० ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी आढळली. त्याची अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २ कोटी ७२ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघा आरोपीच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news