Mahad Car Accident: मुंबई-गोवा महामार्गावर टायर फुटून कार उलटली; अपघातात एकाचा मृत्यू, चौघे जखमी

केंबुर्ली गावाजवळील घटना; कारमधील दोन प्रवाशांसह रस्त्यावरील दोन कामगार जखमी
Mahad Car Accident
Mahad Car AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

महाड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड तालुक्यांतील केंबुर्ली गावाच्या हद्दीत निलकमल हॉटेलजवळ बुधवारी (७ ऑक्टोबर) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला.

भरधाव कारचा टायर फुटल्याने वाहन चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाली. या अपघातात वाहन चालक जमीर शेखलाल शेख ( ४१, रा. गोरेगाव-पश्चिम मुंबई) यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला.

कारमधील सह प्रवासी मोहम्मद रफीक मोहम्मद युसूफ झवेरी (५१) आणि मोहम्मद आसिफ मोहम्मद हुसेन चौधरी (३०, दोघेही रा. गोरेगाव-पश्चिम, मुंबई) , त्याच बरोबर रस्त्यावर काम करणारे कामगार सुनील मंगल पंदराम (वय २१, रा. म्हाप्रळ) आणि खुन्नू बलहारी सिलू (वय ३४, रा. मंडणगड) हे दोघेही जखमी झाल्याची माहिती महाड शहर पोलिसांनी दिली आहे.

Mahad Car Accident
Kal Kumbhe Project: काळ-कुंभे जलविद्युत प्रकल्प बारगळण्याच्या मार्गावर; आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण

कार केंबुर्ली हद्दीतून जात असताना अचानक टायर फुटला. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाली. अपघातात जमीर शेखलाल शेख यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातात मोहम्मद रफीक मोहम्मद युसूफ झवेरी व मोहम्मद आसिफ मोहम्मद हुसेन चौधरी यांना दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगीतलेतसेच रस्त्यावर काम करणारे कामगार सुनील मंगल पंदराम आणि खुन्नू बलहारी सिलू यांनाही कार धडकल्याने दुखापत झाल्याची आहे.

Mahad Car Accident
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर जाणे झाले सोपे! दादर, सीएसएमटी, बोरिवली अन् पुण्याहून थेट एसटी बस

या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात जमिल शेखलाल शेख, रा. गोरेगाव (पश्चिम) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच महाड शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व पुढील तपासाची कार्यवाही सुरू केली. पोलीस उपनिरीक्षक शेख हे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news