सुमित घरत
Wedding Tent Issues
भिवंडी : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे मंडप व्यवसायावर विरजण पडण्यासह व्यावसायिकांना प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वधू वर मंडळीने केलेला खर्चही बाया जात आहे. त्यामुळे अवकाळीचा कहर पाहता उरलेले विवाह सोहळे निट पार पडण्यासाठी मंडपावर ताडपत्रीचे आवरण खर्चीक असले तरी आधारवड ठरत आहे. एकूणच वधू, वर मंडळी साबधान झाल्याचे पहायला मिळत आहे.
मे महिन्यात अचानक हजेरी लावलेल्या पावसाने यंदा सर्वांचीच धावपळ केली आहे. वधू वर मंडळीने लग्र कार्यात होणाऱ्या खर्चावर अवकाळीचे विरजण थांबवण्यासाठी मंडपावरती ताडपत्रीचे आवरण देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वधू वर मंडळीला लग्नाचा बार उरकण्यासाठी मंडपाचा खर्च दुपटीने वाढल्याची माहिती मंडप व्यावसायिकाने दिली आहे.
एकीकडे में महिन्यातील लग्न कायाँचा बार मोठ्या प्रमाणात उडत आहे. दुसरीकडे अवकळीचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे लग्न समारंभांची मंडपे एका बाजूला वाकल्याने नियोजना प्रमाणे आयोजित केलेल्या लग्न कार्यक्रमांचा खोळंबा होत आहे. तसेच वधू वर मंडळीने जेवणावर केलेला खर्चाचाही अपव्यय होत आहे. तर अवकाळी पावसाच्या भीतीने डीजे वाल्यांनीही त्यांचे साहित्य पावसात भिजून नुकसानीच्या भीतीने ऑर्डर्स घेण्यास मनाई करीत असल्याची माहिती बधू वर मंडळीकडून मिळत आहे.
त्यातच नुकत्याच पार पडलेल्या लग्न कार्यात पावसामुळे भिवंडीतील एका लग्र समारंभात वऱ्हाडी मंडळीसह वधू वराची धावपळ झाल्याचे एका व्हायरल व्हिडिओतून समोर आले होते. एकंदरीत पवित्र लग्र कार्य सुरळीत पार पडण्यासाठी व अवकाळीमुळे होणारे नुकसान टाळण्यासह वऱ्हाडी मंडळीची त्रेधातिरपीट होऊ नये, याकरिता तालुक्यातील लग्न कार्य होऊ घातलेल्या वधु वर मंडळीकडून मंडपांवर ताडपत्रीचे आवरण टाकून सावध पाऊल उचलले जात असल्याचे दिसून येत असून वधू वर मंडळीसाठी अवकाळीने लग्न कार्य दुपटीने खर्चिक झाला आहे.