Thane Railway Station: ठाणे रेल्वेस्थानकाने घेतला मोकळा श्वास

स्टेशन परिसरातील बंद मार्गिका खुली, वाहतूक; मोकळी आमदार संजय केळकर यांनी वाहतुकीचा घेतला आढावा
Thane Railway Station
Thane Railway StationPudhari
Published on
Updated on

ठाणे: ठाणे स्टेशन परिसरात बंद मार्गिका खुली केल्याने रिक्षांची वाहतूक मोठ्या प्रमाणात मोकळी झाली. आमदार संजय केळकर यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या पाहणी दौऱ्यात हा निर्णय घेण्यात आला.

आज झालेल्या संयुक्त दौऱ्यात आमदार संजय केळकर यांनी रिक्षांच्या मार्गिका, स्टेशन परिसरातील चौकी, जुने बस स्थानक आणि रेल्वे स्थानक परिसराची पाहणी करून अनेक सूचना केल्या.

Thane Railway Station
Raigad Car Stuck: कोंडविली आरावी बीचवर पर्यटकांची कार समुद्रात अडकली

यावेळी राज्य परिवहनचे विभाग नियंत्रक कैलास पाटील, डीटीओ शिंदे, वाहतूक शाखेच्या सहायक आयुक्त भोईर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहिणी सोनार, आरटीओचे खाडे, ठाणे नगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौधरी तसेच स्थानिक नगरसेविक संजय वाघुले, नगरसेविका नम्रता कोळी, उषा वाघ, विशाल वाघ यांच्यासह नगरसेविका प्रतिभा मढवी, नगरसेवक सुनेश जोशी आदी उपस्थित होते.

स्टेशन परिसरातील एक मार्गिका बंद केल्याने रिक्षांची वाहतूक मंद झाली होती. केळकर यांच्या सुचनेनंतर ही मार्गिका खुली करण्यात आल्याने वाहतूक मोकळी झाली. यावेळी मुजोर रिक्षाचालकांना चाप लावण्यासाठी तसेच भाडे नाकारणाऱ्या आणि शेअर रिक्षा चालकांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

स्टेशन परिसरातील जुन्या बस स्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य असून वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. पीपीपी तत्वावर स्मार्ट स्थानक होणार असले तरी सध्या खड्डयांची समस्या दूर करण्यासाठी काँक्रीटीकरण तातडीने सुरू करण्याच्या सूचना केळकर यांनी केल्या. तर काँक्रीटीकरणाचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Thane Railway Station
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा जोर कमी

संयुक्त चौकी सुरू करावी

रेल्वे स्थानक परिसरात देखील गर्दुल्ले आणि तळीरामांचा वावर मोठ्या प्रमाणात असून प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक शाखा, रेल्वे आणि पोलिसांची संयुक्त चौकी सुरू करण्याच्या सूचनाही केळकर यांनी केल्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news