Thane Crime: ठाणे रेल्वे स्थानकाजवळ एकाची हत्या; पैशांच्या वादात मित्राला वाचवताना अल्पवयीनने भोसकले

या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी याबाबत माहिती दिली.
Thane Crime
Thane CrimePudhari Photo
Published on
Updated on

ठाणे: जुन्या पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून ठाणे रेल्वे स्थानक परिसरात झालेल्या हल्ल्यात विशाल पटेकर (वय अंदाजे 18-20) या तरुणाचा मृत्यू झाला, तर 16 वर्षीय अनमोल गंभीर जखमी झाला. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी याबाबत माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनमोल हा आपल्या मित्र विशाल पटेकर, मयुरेश जाधव आणि इतर मित्रांसह 5 मे रोजी रात्री ठाणे रेल्वे स्थानकात आला होता. त्यांचा एक मित्र उत्तर प्रदेशला जाणार असल्याने त्याला सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बसवण्यासाठी सर्वजण स्थानकात आले होते.

Thane Crime
Teacher Training Mandatory: शिक्षकांना आता दरवर्षी प्रशिक्षण;पन्नास तासांचे प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक

यानंतर ते फलाट क्रमांक 2 कडे जात असताना त्यांना त्यांचा ओळखीचा राघव(अल्पवयीन नाव बदलेले) भेटला. रेल्वे ट्रॅकजवळ उभे राहून गप्पा मारत असताना जुन्या पैशांच्या देवाण-घेवाणीचा वाद पुन्हा उफाळून आला. वाद वाढताच राघवने संतापाच्या भरात अनमोलची कॉलर पकडून धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला.

Thane Crime
Foreign tourist quota misuse: परदेशी पर्यटकांच्या कोट्यातून प्रवास करणे पडले महागात; 121 प्रवाशांकडून दंड वसूल

या हल्ल्यात अनमोलच्या ओठाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, मित्राला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या विशाल पटेकरवरही आरोपीने वार केले. या हल्ल्यात विशाल गंभीर जखमी झाला. जखमी विशालला तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news