Pradeep Purnekar Case: पूर्णेकर हत्याप्रकरणी लवकरच मोठी अटक? पोलिसांच्या हतबलतेमुळे पूर्णेकर कुटुंबीय न्यायालयात जाणार

प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी कुटुंबीय उच्च न्यायालयात जाणार; पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
Pradeep Purnekar Case
Pradeep Purnekar Casepudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे: ठाकरे शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी १६ व्हिडीओंसह सबळ पुरावे देऊनही शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना पोलीस अटक करीत नसल्याने उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी पूर्णेकर कुटुंबीयांनी केली आहे.

या खून प्रकरणावरून पक्षाची आणि पोलीस खात्याची प्रचंड बदनामी होत असल्याने शिवसेनेत असंतोष निर्माण झाला असून लवकरच एक मोठी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Pradeep Purnekar Case
Mumbai CNG Price Hike: मुंबईत सीएनजी महागला; प्रतिकिलो १ रुपयाची वाढ, नवा दर ९० रुपये

शिवसेना ठाकरे गटाचे मानपाडा विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबरला गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पूर्णेकर यांनी अखेरचा श्वास सोडला की नाही हे तपासून आरोपीने त्यांच्यावर चॉपरने वार केले. याप्रकरणी पाच आरोपी अटक करण्यात आले आहेत. मात्र पोलिसांनी उत्तरप्रदेशातून पकडून आणलेला मोटर सायकलवरील हेल्मेटधारी पाचवा आरोपी हा डमी असल्याचे पुरावे पूर्णेकर यांचे सुपुत्र राम पूर्णेकर यांनी पोलिसांना दिले आहेत.

हेल्मेटधारी शिंदेच

हत्येच्या एक तास अगोदर महाराजा हॉटेलसमोरही सीसीटीव्हीमध्ये चार आरोपींसोबत चहा पिताना राजेंद्र शिंदे दिसतात. तो चहा पिताना दिसताो तो मीच आहे, अशी कबुली देखील शिंदे यांनी पोलीस चौकशीत दिल्याचे समजते.

त्यामुळे खुनाच्या वेळी मोटारसायकलवर बसलेला हेल्मेटधारी पाचवा आरोपी हा राजेंद्र शिंदेच असल्याचा दावा पूर्णेकर यांनी एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून केला. मात्र त्याची फॉरेन्सिक तपासणी करण्यास पोलिसांनी २९ दिवस घालविल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Pradeep Purnekar Case
Uddhav Thackeray: २०१९ पासून थांबलेला फोन पुन्हा सुरू होणार नाही; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

आणखी एक व्हिडीओ येतोय

प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणात पाचव्या हेल्मेटधारी आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर येणार आहे. हत्येपूर्वी आरोपींसोबत चहा पितानाचा जो व्हिडीओ समोर आला. त्यात संशयित आरोपी राजेंद्र शिंदे यांचे कपडे, बूट हे हत्येच्यावेळी मोटारसायकलवर बसलेल्या हेल्मटधारी आरोपीशी जुळतात.

आता राजेंद्र शिंदे हे हेल्मेट घालत असतानाचा आणखी एक व्हिडीओ आणि प्रत्यक्षदर्शीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अथवा उच्च न्यायालयात सादर करणार असल्याचे राम पूर्णेकर यांनी सांगितले.

बदनामीने शिवसेनेत नाराजी

यादरम्यान, पोलिसांनी फक्त चौकशीचे फार्स सुरू ठेवल्याने महिना उलटला तरी अटकेची कारवाई झालेली नाही. त्यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेची बदनामी होऊ लागली आहे. एवढेच नाही,तर मीनाक्षी शिंदे यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांनी घेऊन पक्षनेतृत्वाला आपल्या नाराजीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी मोठ्या कारवाईचा फटाका फोडून वादाची कोंडी फोडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

आज भाजपची पदयात्रा

दरम्‍यान, पूर्णेकर हत्‍येने ठाण्‍याचे राजकारण तापले असतानाच रविवारी भाजपची लोकतंत्र बचाव पदयात्रा निघणार आहे. ही पदयात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव,भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्‍या नेतृत्वाखाली निघणार आहे. १ नोहेंबर रोजी सकाळी १० वाजता ठाणे महापालिकेजवळील परमार्थ निकेतन येथून सुरू होईल.

आज मुख्यमंत्री फडणवीस ठाण्यात

समाजात अराजकता निर्माण झाली असून लोकशाही वाचविण्यासाठी रविवारी भाजपतर्फे पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठाण्यात येणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे प्रदीप पूर्णेकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणार का, की पूर्णेकर कुटुंबीय पुराव्यांसह मुख्यमंत्र्यांची पदयात्रेनंतर भेट घेणार, याकडे साऱ्या ठाणेकरांचे लक्ष लागले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.