Mumbai CNG Price Hike: मुंबईत सीएनजी महागला; प्रतिकिलो १ रुपयाची वाढ, नवा दर ९० रुपये

महानगर गॅस लिमिटेडकडून दरवाढ लागू; मध्य-पूर्वेतील संकट आणि आयात गॅसच्या वाढलेल्या खर्चाचा परिणाम
CNG Price Hike
CNG Price Hikepudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: मुंबई आणि आसपासच्या परिसरातील वाहनधारकांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १ रुपयाने वाढ केली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत आता सीएनजीचा नवीन दर ९० रुपये प्रतिकिलो झाला असून, हे सुधारित दर ३१ ऑक्टोबर २०२६ च्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत.

यापूर्वी मुंबईत सीएनजीचा दर ८९ रुपये प्रति किलो होता, तो आता ९० रुपये झाला आहे. गेल्या काही महिन्यांत सातत्याने होणाऱ्या या दरवाढीमुळे मुंबईतील लाखो रिक्षा, टॅक्सी, बेस्ट बसेस आणि सीएनजी कार वापरणाऱ्या सर्वसामान्य वाहनधारकांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. या ताज्या दरवाढीनंतर आता स्थानिक रिक्षा आणि टॅक्सी संघटनांकडून भाडेवाढीची मागणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

CNG Price Hike
Uddhav Thackeray: २०१९ पासून थांबलेला फोन पुन्हा सुरू होणार नाही; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

महानगर गॅस लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, मध्य-पूर्व देशांतील संकटामुळे गॅस खरेदीचा खर्च कमालीचा वाढला आहे. त्यातच देशांतर्गत गॅस वाटपात घट झाल्याने कंपनीला महागड्या आयात गॅसवर अधिक अवलंबून राहावे लागत आहे. हा अतिरिक्त आर्थिक बोजा अंशतः कमी करण्यासाठीच ही दरवाढ करण्यात आली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

या ताज्या दरवाढीचा परिणाम सीएनजीवर चालणाऱ्या जवळपास १२.९३ लाख वाहनांवर होणार आहे. यामध्ये ऑटो-रिक्षा, टॅक्सी, खासगी वाहने आणि सार्वजनिक वाहतूक वाहनांचा समावेश आहे.

CNG Price Hike
Residential Flat Commercial Use: निवासी फ्लॅटच्या व्यावसायिक वापरासाठी दिलेली ‘एनओसी’ रद्द

एमजीएलने १ ऑक्टोबरपासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १ रुपयाने वाढ करून ८९ रुपये प्रति किलो केल्यानंतर एकाच महिन्याने ही दरवाढ झाली आहे.

यापूर्वी, सप्टेंबरमध्ये सीएनजीचे प्रतिकिलो दर २ रुपयांनी वाढून ते ८८ रुपये प्रतिकिलो केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.