Thane Politics | भाजप प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरेंच्या बंधूने बांधले राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ

प्रबोध डावखरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
Prabodh Davkhare joins NCP
प्रबोध डावखरे यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाPudhari
Published on
Updated on

Prabodh Davkhare joins NCP

ठाणे: राज्याचे नेते दिवंगत वसंत डावखरे यांचे चिरंजीव प्रबोध डावखरे यांनी बुधवारी (दि.२०) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्याचे बंधू आमदार निरंजन डावखरे हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे पक्ष कमकुवत झाला असताना खासदार पार्थ पवार यांनी थेट दिवंगत वसंत डावखरे यांचे चिरंजीव प्रबोध डावखरे यांना पक्षात घेऊन ठाण्यात ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Prabodh Davkhare joins NCP
Thane news | रेल्वे प्रशासनाचा निष्ठुरपणा! सिमेंट स्लीपरखाली दबून दोन निष्पाप कुत्र्यांची पिल्ले दगावली

वडिलांच्या इच्छेनुसार मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकारणाला सुरुवात केल्याची भावना प्रबोध डावखरे यांनी व्यक्त केली. तसेच वडिलांच्या वेळी ठाण्यात राष्ट्रवादीचे जसे वर्चस्व होते ते वर्चस्व पुन्हा आणण्याचा निर्धार पक्षप्रवेश झाल्यावर माध्यमांशी बोलताना डावखरे यांनी व्यक्त केला. तर तुमच्यापाठीमागे संपूर्ण पक्ष भक्कमपणे उभा असेल असा शब्द छगन भुजबळ यांनी यावेळी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दिलीप वळसे - पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार प्रतापराव चिखलीकर - पाटील, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, युवक नेते व प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदी उपस्थित होते.

Prabodh Davkhare joins NCP
Thane leopard captured | अखेर 'तो' नरभक्षक बिबट्या जेरबंद

ठाण्यातील नेत्यांची अनुपस्थिती

ठाण्यातील प्रबोध डावखरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत असताना पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यासह ठाण्यातील कुणी नेता उपस्थित नव्हता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news