

ठाणे : नवीन वर्षाच्या स्वागत पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठी मोहीम राबवत तब्बल 4 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. गोवा, आसाम, मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात एकाच वेळी छापे टाकत पुणे पोलिसांनी पथकांनी आंतरराज्य ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सातारा ड्रग्ज फॅक्टरीशी याचा संबंध असल्याचा यंत्रणांना संशय आहे.
31 डिसेंबर आणि नववर्ष पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या संख्येने पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांमध्ये कुठेही अमली पदार्थाचा पुरवठा होऊ नये वापर होऊ नये यासाठी पोलिसांनी आधीपासूनच लक्ष केंद्रित केलं होतं.. आणि त्याच आधारे पुणे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आणि ही कारवाई करण्यात आली. पुणे पोलिसांच्याविशेष पथकांनी एकाच वेळी गोवा, आसाम, मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गांजा,पार्टी ड्रग्स, सिंथेटिक ड्रग्स जप्त केले असून, या अमली पदार्थांची अंदाजे किंमत 4 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. ड्रग्स नववर्षाच्या पार्टीसाठी पुणे आणि मुंबई परिसरात अमली पदार्थाचा पुरवठा होणार होता का याचा देखील तपास आता पोलीस करत आहेत.
या प्रकरणात आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली असून, ड्रग्सचा पुरवठा करणारे हे रॅकेट आंतरराज्य पातळीवर कार्यरत असल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपींकडून मोबाईल, आर्थिक व्यवहारांचे तपशील आणि इतर माहिती मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. दरबार पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाई कारवाईबाबत आज दुपारी पुणे पोलिसांकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार असून, यावेळी जप्त केलेल्या ड्रग्सचा अधिक तपशील आणि आरोपींविषयीची अधिक माहिती दिली जाणार आहे.