Thane Police Cyber Fraud: पोलीस कर्मचाऱ्याला 84 हजारांचा गंडा

हॅकर्सने पोलिसांच्या नावावर घेतले लोन
 Cyber Fraud
Cyber FraudPudhari
Published on
Updated on

ठाणे : ठाणे शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या नावावर बँकेतून लोन घेत हॅकर्सने पोलीस कर्मचाऱ्याला 84 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे.

पोलीस कर्मचारी श्रीवाजेद गुलाब आत्तार (वय 35) यांचे ई मेल आणि मोबाईल हॅक करून त्याच्या नावावर कर्ज घेऊन तब्बल 84 हजारांचा ऑनलाईन गंडा घातल्याची तक्रार कळवा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणी कळवा पोलिसांनी अज्ञात हॅकर्स विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 Cyber Fraud
Kalu Dam Protest Murbad: काळू धरणाच्या संघर्षात उतरला सर्वसामान्य माणूस

तक्रारदार पोलीस कर्मचारी श्रीवाजेद गुलाब आत्तार (वय 35) रा. कळवा हे ठाणे शहर पोलीस दलात परिमंडळ-1 मध्ये उपयुक्त कार्यालयात प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. 10 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 8.30 वाजता घरी गेल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर बँकेकडून आयएमपीएस व्यवहाराचे दोन संदेश प्राप्त झाले. त्यामध्ये 50,000 रुपये व 28,000 रुपये खात्यातून वळते झाल्याचे नमूद होते.

 Cyber Fraud
Mumbra Fast Local Train: मध्य रेल्वेने जलद गाड्यांना मुंब्र्यात थांबा द्यावा

यानंतर खात्यातून पैसे काढल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी दुसऱ्या दिवशी तलावपाळी येथील बँक शाखमध्ये याबाबत चौकशी केली असता, 27 जानेवारी रोजी अनोळखी व्यक्तीने त्यांचा मोबाईल व ई-मेल हॅक करून त्यांच्या नावावर ऑनलाईन कर्ज घेतल्याचे समोर आले.

 Cyber Fraud
Thane Patlipada Dongripada eviction: पातलीपाडा–डोंगरीपाडा घरांवर कारवाईचा आदेश; ५ हजार कुटुंबांचा निवारा धोक्यात

तपासात 50 हजाराचे कर्ज घेतल्याचे निष्पन्न कर्ज घेतल्याचे समोर आल्यानंतर तक्रारदार यांचे बँक स्टेटमेंट तपासले असता, 23 हजार 540 रुपये ‌‘डिस्बर्समेंट‌’ स्वरूपात 50 हजार 000 रुपये ‌‘इंस्टा लोन‌’ असे एकूण 73 हजार 540 रुपयांचे कर्ज त्यांच्या नावावर घेण्यात आले होते. त्यानंतर या रकमेतून 73,000 रुपयांची डिजिटल एफडी तयार करण्यात आली. खात्यातील उर्वरित 11 हजार 300 रुपये देखील वापरण्यात आले. तर अनोळखी व्यक्तीने ई-मेल आयडीचा वापर करून हॅकिंग केल्याचे दिसून आले. याशिवाय तक्रारदार यांची कोणतीही परवानगी किंवा संमती नसताना आर्थिक लाभासाठी ही फसवणूक करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी अनोळखी सायबर गुन्हेगाराविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news