Thane Palghar Bank: आज होणार ठाणे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षाची निवड

अध्यक्षपद बविआ की भाजप?
Thane District Bank Election
Thane District Bank ElectionPudhari
Published on
Updated on

ठाणे: ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शनिवारी होणाऱ्या संचालकांच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड होणार आहे. सहकार पॅनेलने १६ जागा जिंकून सत्ता राखल्याने अध्यक्षपद कुणाच्या वाट्याला जाते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

सहकार पॅनल फोडून महायुतीचा अध्यक्ष होईल, असा दावा भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केल्याने अध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव थेट बैठकीत जाहीर करण्याची रणनीती सहकार पॅनलने आखली आहे. त्यामुळे अध्यक्षपद बविआ की भाजपकडे जाते याची साऱ्यांना उत्सुकता लागली आहे.

Thane District Bank Election
Vikramgad Wild Vegetables: विक्रमगड बाजारपेठेत ग्रामीण, आदिवासी भागांतून रानभाज्या

ठाणे जिल्हा सहकारी बँकेच्या २१ संचालकपदाच्या निवडणुकीत सहकार पॅनलने १६ जागा जिंकल्या असून परिवर्तन पॅनलने ४ आणि एक अपक्ष संचालक निवडून आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या सहकार पॅनलने माजी मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडविला.

२१ संचालकांपैकी पहिल्यांदाच शिवसेनेचे ५ संचालक, बहुजन विकास आघाडीचे ४ संचालक, भाजप ४ संचालक आणि काँग्रेस, सीपीएम, राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे प्रत्येकी एक-एक संचालक निवडून आले आहेत.

शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे हे अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत. तर परिवर्तन पॅनममधील विजयी चार संचालकांपैकी तीन संचालक भाजप तर एक संचालक शिवसेना शिंदे गटाचा आहे. अशी सरळ सत्त्तेची गणित असताना भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दोन्ही पॅनलमधील भाजपचे ८ आणि शिवसेना शिंदे गटाचे ७ संचालक असे १५ संचालक निवडून आल्याने महायुतीचा अध्यक्ष होईल असा दावा केला.

Thane District Bank Election
Tarapur MIDC Pollution: विधानसभेत गाजला तारापूर एमआयडीसीच्या प्रदूषणाचा मुद्दा; आ. राजेंद्र गावित यांचा सरकारला जाब

त्यामुळे सहकार पॅनलमधील सर्व पक्षीय संचालक आणि नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मात्र सर्व पक्षीय पॅनल असलेल्या सहकार पॅनलचाच अध्यक्ष करण्याचा निर्णय होऊन अध्यक्षपद विभागून घेण्याचा फॉर्मुला पुढे आला आहे.

त्यानुसार पहिले वर्ष कुणाकडे जाईल हे उद्या होणाऱ्या संचालकांच्या पहिल्या बैठकीत ठरेल. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांचे कोण उमेदवार असेल हे रात्री उशिरा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करून माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि भाजप आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुरेश म्हात्रे हे निर्णय घेतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news