Thane Navratri Mandap: ठाण्यात नवरात्र मंडपांसाठी २३७ अर्ज; ८० मंडळांना परवानगी, १५७ अर्ज प्रलंबित

यापैकी ८० मंडळांना मंडप उभारणीची परवानगी देण्यात आली असून तब्बल १५७ अर्ज अद्याप निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.
Thane Navratri Mandap
Thane Navratri MandapPudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: नवरात्रौत्सवाला अवघे काही दिवस उरले असताना ठाणे शहरात मंडप उभारणीची लगबग सुरू झाली आहे. नवरात्रौत्सवासाठी मंडप उभारण्यास परवानगी मिळावी यासाठी ठाणे महापालिकेकडे आतापर्यंत २३७ अर्ज दाखल झाले आहेत.

यापैकी ८० मंडळांना मंडप उभारणीची परवानगी देण्यात आली असून तब्बल १५७ अर्ज अद्याप निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे उर्वरित मंडळांना परवानगी कधी मिळणार, याकडे मंडळांचे लक्ष लागले आहे.

Thane Navratri Mandap
Whale Vomit: ठाण्‍यात व्हेल माशाची ३ कोटींची उलटी हस्तगत; दोघांना अटक

महापालिकेकडे प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ८० अर्ज ऑनलाइन, तर १५७ अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करण्यात आले आहेत. मंडपासाठी प्रस्तावित जागा, वाहतुकीवर होणारा परिणाम, पादचाऱ्यांसाठी उपलब्ध मार्ग, अग्निसुरक्षेच्या उपाययोजना, विद्युत जोडणीची सुरक्षितता तसेच आपत्कालीन मार्ग यांसारख्या बाबींची तपासणी करूनच मंडळांना परवानगी दिली जात आहे.

Thane Navratri Mandap
Mahad Car Accident: मुंबई-गोवा महामार्गावर टायर फुटून कार उलटली; अपघातात एकाचा मृत्यू, चौघे जखमी

नवरात्रौत्सवाच्या काळात शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर मंडप उभारले जातात. देवीची आकर्षक आरास, विद्युत रोषणाई, गरबा-दांडिया तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मंडळांकडून केले जाते. मात्र, उत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी होऊ नये आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेने परवानगीची प्रक्रिया काटेकोर केली आहे.

प्रभाग समितीनिहाय पाहता लोकमान्यनगर-सावरकरनगर परिसरातून सर्वाधिक ४५ अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी २२ मंडळांना आतापर्यंत परवानगी मिळाली आहे. त्याखालोखाल कळवा परिसरातून २९, वर्तकनगरमधून २२, वागळे परिसरातून १९, उथळसरमधून १९ आणि नौपाडा-कोपरी (नौपाडा विभाग) येथून १८ अर्ज दाखल झाले आहेत. मुंब्रा परिसरातून सहा अर्ज प्राप्त झाले असून दिवा परिसरातूनही मंडप परवानगीसाठी अर्ज करण्यात आले आहेत.

अधिकृत परवानगीनंतरच मंडप उभारावेत

नवरात्रौत्सव जवळ आल्याने प्रलंबित अर्जांची छाननी वेगाने पूर्ण करून परवानगी देण्याची मागणी मंडळांकडून होत आहे. दुसरीकडे, महापालिकेची परवानगी न घेता मंडप उभारल्यास संबंधित मंडळांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे मंडळांनी आवश्यक कागदपत्रे व सुरक्षेच्या नियमांची पूर्तता करून महापालिकेची अधिकृत परवानगी घेतल्यानंतरच मंडप उभारावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news