दिव्यातील 9 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; शपथपत्रातील कथित खोटी माहितीप्रकरणी न्यायालयात इलेक्शन पिटीशन दाखल

संबंधित नगरसेवकांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता, बांधकामे, आर्थिक माहिती तसेच इतर आवश्यक बाबींची संपूर्ण माहिती जाहीर न केल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आला आहे.
High Court News
High Court NewsPudhari
Published on
Updated on

ठाणे: ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये दिवा परिसरातून निवडून आलेल्या शिंदे गटाच्या काही नगरसेवकांविरोधात निवडणूक शपथपत्रात कथितरित्या चुकीची, अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याप्रकरणी न्यायालयात इलेक्शन रिट पिटीशन दाखल करण्यात आल्याची माहिती ॲड. रोहिदास मुंडे यांनी दिली.

संबंधित नगरसेवकांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता, बांधकामे, आर्थिक माहिती तसेच इतर आवश्यक बाबींची संपूर्ण माहिती जाहीर न केल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आला आहे. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे व मालमत्ता लपविल्याचाही मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आला असल्याचे समजते.

High Court News
Maharashtra Politics: जनतेला पुन्हा बैल, गाढव, घोड्यावर प्रवास करावा लागेल; जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारवर निशाणा

मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांनुसार निवडणूक शपथपत्रात चुकीची अथवा अपूर्ण माहिती देणे हे गंभीर स्वरूपाचे प्रकरण मानले जाते. जनप्रतिनिधींनी मतदारांपासून तथ्य लपविल्यास संबंधित निवडणूक रद्द होण्यासह लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 मधील तरतुदींनुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे ॲड. रोहिदास मुंडे यांनी स्पष्ट केले.

विशेषतः लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मधील कलम 33, कलम 36 तसेच भारतीय न्यायव्यवस्थेने वेळोवेळी दिलेल्या आदेशांनुसार उमेदवाराने सत्य व संपूर्ण माहिती देणे बंधनकारक आहे. खोटी माहिती सादर करणे किंवा तथ्य लपविणे हे मतदारांची दिशाभूल करणारे कृत्य मानले जाते.

High Court News
Water Crisis: पालघरमध्ये जलजीवन मिशनची कामे ठप्प; सफाळे पूर्व-पश्चिम भागात पाणीटंचाई

या प्रकरणात रमाकांत मढवी, शैलेश पाटील, आदेश भगत, दीपक जाधव, साक्षी मढवी, दर्शना म्हात्रे, अर्चना पाटील, दिपाली भगत आणि स्नेहा पाटील या नगरसेवकांविरोधात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती ॲड. रोहिदास मुंडे यांनी दिली.

सदर बाब न्यायालयाच्या विचाराधीन असून संबंधित उमेदवारांविरोधात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेमध्ये शपथपत्रातील माहितीबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news