TMC HQ Liquor | ठाणे महापालिका मुख्यालयाच्या आवारातच शहर अभियंत्यांच्या वाहनावरील चालकाकडून भर दुपारी मद्यपान

तर दुसरीकडे वाहन चालकांकडून मुख्यालयाचे व्हीआयपी गेट तोडून पळ काढण्याचा प्रयत्न
Thane Municipal Corporation news
ठाणे महापालिका मुख्यालयाच्या आवारातच गाडी लावून गाडीमध्ये चक्क मद्यपान करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाPudhari
Published on
Updated on

Thane Municipal Corporation news

ठाणे : ठाणे महापालिका मुख्यालयाच्या आवारात ज्या ठिकाणी नेहमीच लोकप्रतिनिधी आणि अतिमहत्वाच्या व्यक्तीची वर्दळ असताना त्याच ठिकाणी गाडी लावून गाडीमध्ये चक्क मद्यपान करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

शहर अभियंता प्रशांत सोनग्रा यांच्या गाडीवर असलेल्या वाहन चालकांचा हा प्रताप आहे. गाडीमध्ये मद्यप्राशन करताना रंगेहात पकडल्यानंतर एका वाहन चालकांकडून थेट मुख्यालयाचे व्हीआयपी गेट तोडून गाडी घेऊन पळ काढण्याचा प्रयत्नही करण्यात आला . यामुळे आता पालिकेच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.

Thane Municipal Corporation news
Thane Municipal Corporation News | निम्मी ठाणे महापालिका झाली रिकामी

ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर आता महासभा देखील अस्तित्वात आली आहे. याशिवाय महापौर आणि उपमहापौर यांची देखील निवड झाल्याने आता पालिका मुख्यालयात एरवी पेक्षा आता अतिमहत्वाच्या व्यक्तींची वर्दळ वाढली आहे. याशिवाय पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तसेच महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांच्या गाड्या याच व्हीआयपी गेटमधून प्रवेश करतात.

याची ठिकाणी सोमवारी दुपारच्या वेळेस मुख्यालयाच्या आवारातच व्हीआयपी परिसरात भर दिवसा गाडी लावून गाडीमध्येच मद्य प्राशन करत असल्याचा प्रकार पत्रकार प्रफुल वाघुले यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी या वाहन चालकांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

Thane Municipal Corporation news
Thane Municipal Corporation : पहिल्याच महासभेत स्थायी समितीसह विशेष समित्यांचा मार्ग होणार मोकळा

मात्र, या वाहन चालकांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्यानंतर त्याचा व्हिडिओ काढला. त्यानंतर मात्र, एका वाहन चालकाने गाडी थेट गेट तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. गाडी भरधाव वेगात गेट तोडून बाहेर गेली.

या दोन्ही वाहन चालकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी कळवा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर संपूर्ण चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news