Thane Municipal Corporation : पहिल्याच महासभेत स्थायी समितीसह विशेष समित्यांचा मार्ग होणार मोकळा

ठाणे महापालिकेची महासभा 20 फेब्रुवारी रोजी लागण्याची शक्यता
Thane Municipal Corporation General Body Meeting
पहिल्याच महासभेत स्थायी समितीसह विशेष समित्यांचा मार्ग होणार मोकळाpudhari photo
Published on
Updated on

ठाणे : येत्या 20 फेब्रुवारी रोजी ठाणे महापालिकेची महासभा लागण्याची शकतात आहे. या पहिल्याच महासभेत ठाणे महापालिकेची तिजोरी असलेल्या स्थायी समिती बरोबरच, शिक्षण मंडळ, परिवहन समिती, विरोधी पक्षनेता आणि पाच विशेष समित्यांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व समित्यांवर आपली वर्णी लागावी यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे.

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असून त्यांचे 75 नगरसेवक निवडून आले आहेत, भाजप 28, राष्ट्रवादी (शरद पवार) 12, राष्ट्रवादी (अजित पवार) 9, एमआयएम 5, उबाठा 1 आणि अपक्ष 1 असे 131 नगरसेवक निवडून आले आहेत. शिंदेच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत असल्याने स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन, विषय समित्यांमध्ये शिंदे सेनेला मोठा वाटा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Thane Municipal Corporation General Body Meeting
Konkan Politics : तटकरे, राणेंच्या नेतृत्वाला धुमारे!

स्थायी समितीमध्ये 16 सदस्य जाणार आहेत. त्यात शिंदे सेनेचे 9, भाजप 3, राष्ट्रवादी (शरद पवार) 1 आणि राष्ट्रवादी (अजित पवार) 1 आणि एमआयएम 1 असे 15 सदस्यांचे समीकरण आहे. परंतु उर्वरित एक सदस्य हा कोणाचा जाणार याबाबत आता उत्सुकता वाढली आहे.

कोकण आयुक्तांकडे सर्व पक्षांनी गट नोंदणी केलेली आहे. परंतु 16 फेब्रुवारी ही अंतिम मुदत असल्याने त्यानंतरच खरी गटनोंदणीची माहिती ठाणे महापालिकेला उपलब्ध होणार आहे. त्यातही दोन ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असल्याने तसेच राष्ट्रवादी (अजित पवार) आणि एमआयएम एकत्र येण्याची चर्चा असल्याने तसे झाल्यास गटनोंदणी देखील काहीशी बदलणार असून त्याची वाट महापालिका पाहत आहे.

Thane Municipal Corporation General Body Meeting
Fake Tribal Caste Certificate : बोगस आदिवासी जातप्रमाणपत्रांची शोधमोहीम

इतर समिती

  • विषय समित्या : 9 सदस्य

  • परिवहन समिती : 12

  • सदस्य (एक पदसिद्ध सदस्य) असे 13 सदस्य

  • शिक्षण मंडळ : 9 सदस्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news