

ठाणे : ठाणे मनोरुग्णालयामध्ये राज्याच्या विविध भागातून मानसिक अस्वास्थ्य निर्माण झालेले रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र ते बरे झाल्यांनंतरही त्यांना पुन्हा घरे नेले जात नसल्याने केव्हातरी आपल्याला मायेची उब मिळेल म्हणून हे रुग्ण घरच्यांच्या वाटेकडे डोळे लावून असतात. कधी काळी या रुग्णांनी मानसिक अस्वास्थ्याच्या कारणाने घरच्यांना त्रास दिलेला असतो. त्यामुळे घरच्यांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवलेली आहे. असे 10 ते 12 रुग्ण आजही या मनोरुग्णालयात घरच्यांच्या आठवणीने अस्वस्थ असल्याचे पाहायला मिळते.
आई मला घरी घेऊन जाशील का अशी आर्ट हाक अनेकदा ऐकायला येते. पण त्याला प्रतिसाद मिळत नाही. ती निरागस आणि आप्तांच्या मायेची ओढ लागलेली हाक असते.. ठिकाण - ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय ! घरात दररोजचा दंगा आणि कधी काही फेकून मारे याची शास्वती नाही अशी घरच्यांना जड झालेली आणि मानसिक स्वास्थ्य हरवलेली रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयात दाखल होतात.
जवळपास 2 हजार रुग्ण येथे दाखल होऊ शकतात एवढी या मनोरुग्णालयाची क्षमता आहे. या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे 3 हजार पर्यंत रुग्णसंख्या विस्तारित होणार आहे. आज दाखल असलेले रुग्ण आणि त्यांची चार भिंतीतील अडकल्याची तळमळ अनेकदा डोकावून बाहेर येते. हक्काचे माणसांनी आपल्याकडे पाठ फिरवल्याचे भावना त्यांच्या चेहऱ्यावर दाटून येते.
माझी आई, माझे बाबा, माझे नातेवाईक, माझे कुटुंबीय केव्हातरी येतील आणि मला घेऊन जातील अशी भाबडी आशा मनात ठेवून हे रुग्ण येणार दिवस पुढे ढकलत असतात. पूर्वी केव्हातरी त्यांनी अनुभवलेले मायेचे क्षण त्यांच्या डोळ्यासमोर तरळत असतात. पण दिवसामागून दिवस जातात आणि कुटुंबीयांचा पत्ता नसतो.
रुग्णालयाचे अधिकारी या कुटुंबियांशी अनेकदा संपर्क करतात. त्यांनी रुग्णाला दाखल करण्याच्या वेळी दिलेला पत्ता तपासण्याचा प्रयत्न करतात आणि बऱ्याचदा निराशाच येते. मात्र हे रुग्ण चार भिंतीत अडकून पडतात.
महाराष्ट्रात पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी येथे ही रुग्णालये आहेत. प्रत्येक ठिकाणची स्थिती ही काही अंशी सारखीच आहे. ठाणे रुग्णालयात सध्या 651 मनोरुग्ण उपचार घेत आहेत. तर 351 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. पण त्यांचे नातेवाईक सापडत नाहीत. काहींनी दिलेले पत्तेही चुकीचे आहेत. असे हे रुग्ण महाराष्ट्रातील विविध निवारा केंद्रांमध्ये आयुष्य ढकलत आहेत. नकोश्या झालेल्या या रुग्णांचे जीवन हे सरकारी अंत्रणेच्या लहरी कारभारावर अवलंबून आहे.
ठाणे मनोरुग्णालायचे अधिक्षक नेताही मुळीक यांना विचारले असता, “बरे झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मातुर समोरून कोणताच प्रतिसाद नाही. असे 351 रुग्ण आम्ही पुनर्वसन केंद्रात पाठवले आहेत.