Thane Crime : माथाडी कर्मचाऱ्यावर चॉपरने हल्ला; कुटुंबालाही मारहाण

कापूरबावडी पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे : दोघांमध्‍ये झालेल्या वादात मध्यस्थी करत वाद मिटविण्यासाठी समजूत काढीत असतानाच तक्रारदार माथाडी कामगार महेश दत्ताराम कदम (४२) यांच्यावर चौघांनी चॉपरने हल्ला करून जखमी केल्याची घटना ११ नोव्हेंबरला रात्री साडे दहा वा. घडली.

कापूरबावडी पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महेश कदम (४२) असे जखमी कामगाराचे नाव आहे. ११ नोव्हेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास ते घरी जात असताना मित्र भेटला.

Crime News
Suryakumar Yadav SMT: 6,6,6,6,6,... सूर्यानं पुन्हा कॅप्टन होताच दाखवलं आपलं 'तेज'; BCCI ला करावा लागणार पुन्हा विचार

दोघांमध्ये वादावर चर्चा सुरू असताना राजू, बाबू, बाला आणि प्रशांत तेथे आले. त्यांनी मध्यस्थी करणाऱ्या महेश यांच्याकडे मारहाणीबाबत विचारणा करीत त्यांनी महेश यांच्याशी वाद घातला. त्यानंतर चौघांनी त्यांना मारहाण केली.

Crime News
Raigad News : कळंबोलीतील कंटेनर अपघातामुळे वाहतूककोंडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.