Kalyan Crime | कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांची रक्षाबंधनापूर्वी बहिणींना अनोखी भेट : अडीच लाखांचे दागिने हस्तगत

दोघा सराईत चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत केले जेरबंद
Kalyan  Railway Police  Arrests Thieves
Kalyan Railway Police Arrests ThievesPudhari
Published on
Updated on

Kalyan Railway Police Arrests Thieves

डोंबिवली : मेल/ एक्स्प्रेसमधून महिला प्रवाशांचे अडीच लाखांचे दागिने लांबविणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत जेरबंद करून दोन बहिणींना रक्षाबंधनापूर्वी अनोखी भेट दिली आहे. कल्याण रेल्वे पोलिसात दाखल असलेल्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या समांतर तपासादरम्यान रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या अंगझडतीत दोन्ही गुन्ह्यातील महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन सापडल्या आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत आरोपींना अटक करत त्यांच्याकडून चोरलेले दागिने हस्तगत करत कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन बहिणींना रक्षाबंधनाची अनोखी भेट दिली आहे, मेल/एक्सप्रेसच्या डब्यात बसून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरणाऱ्या दीपक रामसरिक चौहान (२०) आणि सनीदेवल भोला चंद्रभान चौहान (२३, दोघेही राहणार उल्हासनगर ३) या दोन गुन्हेगारांकडून १७.५३ ग्रॅम वजनाच्या २ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चेन हस्तगत करून दोन गुन्हे उघड करण्यात आले आहेत.

Kalyan  Railway Police  Arrests Thieves
Kalyan Crime : चार अल्पवयीन मुलींना घरात डांबून ठेवले

कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पहिल्या गुन्ह्यातील फिर्यादी महिला प्रवाशी या २६ ऑगस्ट रोजी रात्री २०.२० वाजताच्या सुमारास सुरत रेल्वे स्टेशन येथून इंदोर खडकी स्पेशल एक्सप्रेसने प्रवास करून २७ ऑगस्ट रोजी पहाटे ०१.२० वाजताच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन फलाट नंबर ६ वर येत असताना तिच्या गळ्यातील सोन्याची चेन अज्ञात चोरट्याने चोरली असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर पुन्हा कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल दुसऱ्या गुन्ह्यातील महिला प्रवाशी या दिनांक २६ ऑगस्ट रोजी रात्री २३.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून एलटीटी एसएमव्हीबी एक्सप्रेसच्या बोगीतून प्रवास करत असताना २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.४५ च्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन फलाट नंबर ६ वर आल्यानंतर तिच्या गळ्यातील सोन्याची चेन अज्ञात चोरट्याने चोरली असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Kalyan  Railway Police  Arrests Thieves
Kalyan Crime : पार्टीचा 'हँगओव्हर' संपायच्या आत बेड्या; मेल-एक्स्प्रेसमधील दागिने चोरणारी जोडगोळी जेरबंद!

दोन्ही गुन्हे दाखल झाल्यानंतर समांतर तपास सुरू करत गुन्ह्याच्या घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून घेण्यात आले. त्या आधारे दोन संशयित इसम घटनास्थळावर संशयास्पदरित्या वावरताना दिसून आले. सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्यांचे फोटो उपलब्ध करून सदर फोटोच्या आधारे आणि खबऱ्यांच्या मदतीने शोध घेतला असता २८ ऑगस्ट रोजी सकाळी ०९.२० वाजता दीपक चौहान (२०) आणि सनीदेवल चौहान (२३) या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या अंगझडती घेतली असता त्यांच्या खिशात १७.५३ ग्रॅम वजनाच्या २ लाख ४५ हजार रूपयांच्या दोन सोन्याच्या चेन मिळून आल्या. केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी दोन्ही सोन्याच्या चेन संगनमताने चोरल्याचे निष्पन्न झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news