Kalyan Crime : चार अल्पवयीन मुलींना घरात डांबून ठेवले

धाडसी मुलीने लाईव्ह लोकेशन पाठवल्यानंतर प्रकार उघड; कल्याण-द्वारलीतील प्रकार
Kalyan minor girls confined in house
Kalyan minor girls confined in housepudhari photo
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या द्वारली गावठाण परिसरातील एका घरात चार अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने एका घरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

यातील एका अपहृत मुलीने धाडस दाखवून प्रसंगावधान राखत आईला लाईव्ह लोकेशन पाठवले आणि हा सारा प्रकार उजेडात आला. दरम्यान कोळसेवाडी पोलिसांनी तत्परता दाखवत मुलींचे अपहरण करणाऱ्या मुख्य अपहरणकर्त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेने संपूर्ण कल्याण परिसरात खळबळ उडाली आहे.

Kalyan minor girls confined in house
Mumbai traffic jam : सुट्टीचा मुहूर्त साधत घराबाहेर पडलेल्या नागरिकांमुळे मुंबईत जागोजागी वाहतूककोंडी

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. सुरुवातीला ती मैत्रिणीकडे किंवा नातेवाईकांकडे गेली असावी, असा कुटुंबीयांचा कयास होता. मात्र ती परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत होते. याच दरम्यान त्या बेपत्ता मुलीने धाडसाने मोबाईलच्या माध्यमातून आपल्या आईशी संपर्क साधला.

एक तरुण आपल्याला त्रास देत असून द्वारली येथील एका बंद घरात जबरदस्तीने डांबून ठेवल्याची माहिती तिने आईला दिली. तसेच आपण कशीतरी त्या घराच्या खिडकीतून बाहेर पडून एका इमारतीखाली लपल्याचे सांगत तिने मदतीची याचना केली.

मुलीचा हा मेसेज आणि तिची अवस्था समजताच आईने प्रसंगावधान दाखवत तातडीने तिला लाईव्ह लोकेशन पाठविण्यास सांगितले. त्यानंतर आपत्कालीन मदत क्रमांक ११२ वर फोन करून पोलिसांना या गंभीर प्रकाराची माहिती दिली. माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांचे पथक आणि मुलीचे नातेवाईक तातडीने त्या ठिकाणी पोहोचले.

Kalyan minor girls confined in house
Maharashtra Congress boost : राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे काँग्रेस ‘ॲक्टिव्ह मोड’वर

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपहरणकर्त्यावर कारवाई करत अपहृत मुलीसह अन्य तीन अशा एकूण चार अल्पवयीन मुलींची सुखरूप सुटका केली. या मुलींचे अपहरण करून त्यांना घरात डांबून ठेवल्याच्या संशयावरून पोलिसांनी चेतन नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

आरोपीवर यापूर्वीही गुन्हे

प्राथमिक तपासात समोर आले आहे की, चेतन याच्यावर यापूर्वीही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. या घटनेमुळे कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या द्वारली परिसरातील पालकांसह स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या मुलींना नेमके कोणत्या कारणासाठी डांबून ठेवले होते? त्यांच्यासोबत काही गैरप्रकार झाले आहेत का? याचा उलगडा करण्यासाठी कोळसेवाडी पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news