KDMC Vaccination: 'लस कल्याणा'ची उपक्रमाअंतर्गत बैलबाजार येथे जनजागृती; लसीकरणाबाबतचे गैरसमज केले दूर

Kalyan News: स्थानिक सहभाग वाढविण्यासाठी आरोग्य केंद्रांना रॉबिन मार्टिन आणि जीएव्हीआय या कंपनीच्या शिष्टमंडळाने दिली भेट
KDMC Vaccination Campaign
KDMC Vaccination CampaignPudhari
Published on
Updated on

Las Kalyanachi KDMC Vaccination Awareness Campaign

कल्याण: कल्याण शहरातील लस कल्याणाची प्रकल्पा अंतर्गत जनजागृतीसाठी बैलबाजार येथे कल्याण बैलबाजार गोविंदवाडी या भागात जनजागृती मोहीम हाती घेण्याल आली. यामध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी तसेच या प्रकल्पाच्या रॉबिन मार्टीन यांनीही यात सहभाग घेतला.

सामाजिक दृष्टीकोनातून तंत्रज्ञान विकास संस्थेने २७ ऑक्टोबर २०२० रोजी कल्याण पश्चिम येथील पुराणा गोविंदवाडी येथील बैलबाजार येथे शिष्टमंडळासह लसीकरण उपक्रमाला अनुसरून 'लस कल्याणाची हा सामूदायिक कार्यक्रम आयोजित केला. पुढारी न्यूजच्या भागीदारीत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्दिष्ट ठाणे जिल्ह्यातील कल्याण विभागातील नियमित लसीकरणाबद्दल जागरूकता वाढवणे असा आहे. लसीकरणाबाबबत असलेले गैरसमज कमी करणे आणि संपूर्ण लसीकरण करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देणे असा उद्देश आहे.

KDMC Vaccination Campaign
KDMC election : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीची आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला

स्थानिक स्वरावर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश या उपक्रमात केंद्रित करण्यात आला आहे. लोकांच्या हिताच्या लसीकरणाला प्रोत्साहन देउन कल्याण भागात समज गैरसमज दूर करून या लसीकरणाचे महत्व पटवून दिले जात आहे. या कार्यक्रमावेळी श्रीमती सरेना तोहमे आणि श्रीमती थिया लासेटें या रॉबीन मार्टिन कंपनीतर्फे प्रतिनिधी व श्रीमती क्रातिका परचानी या जीएल्व्हीआयच्या प्रतिनिधी तर कल्याण महानगर पालिका डब्लूपीपी मीडियाच्या श्रीमती अर्चना चौधरी, अंजली चोचे, पुढारी न्यूजचे अनुप नायर आणि झेडएमक्यू डेयास्तपमेंट जसदेय सिंग आणि श्रीमती दौर्या महेश हे प्रतिनिधी उपस्थित होते.

नियमित लसीकरणाबद्दल समुदाय जागरूकता आणि समज वाढविण्यासाठी, समुदाय सहभाग वाढविण्यासाठी आणि लसीकरण प्रयत्नांची स्थानिक सहभाग वाढविण्यासाठी, सार्वजनिकदृष्ट्या प्रभावी भूमिका पेऊन लोकप्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

KDMC Vaccination Campaign
Kalyan ED Raid | मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्या भावाच्या घरी ईडीचा छापा; 11 तासांपासून चौकशी सुरू

कार्यक्रमाची सुरुवात झेडएमक्यू डेव्हलपमेंटस् फील्ड सुपरवायझर श्रीमती शोभा परझाद यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी लस कल्याणाची उपक्रम, त्याची उद्दिष्टे, समुदान-आधारित हटिकोन आणि स्थानिक प्रभावशाली लोकांना जोडण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी व्हॉट्सअॅप लर्निंग ग्रुप तयार करण्याचा उद्देश स्पष्ट केला. झेडएमक्यू डेवलपमेंटचे प्रकल्प समन्वयक श्री. राखीम खान यांनी उपक्रमाच्या प्रगतीचा आढावा सादर केला आणि पहिल्या दोन कार्यक्रमांमधून मिळालेले महत्त्वाचे मुद्दे आणि उद्देश स्पष्ट करून सांगितले. तसेच लोकांच्या वाढत्या सहभागावर भर देत असल्याचे स्पष्ट केले. ट्रान्सजेंडर समुदाय गटाने सादर केलेल्या "टिका जिंदगी का" या प्रभावी पथनाट्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या नाटकाने वेळेवर लसीकरण, समुदायाची जबाबदारी आणि मुलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्व सर्जनशीलपणे मांडले. या पथनाट्याला प्रेक्षकांकडून उत्साही प्रतिसाद मिळाला.

पथनाट्य सादरीकरणानंतर, अन्सारी चौक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. एमी ठाकूर आणि आशा कार्यकर्त्या संगीता यांनी संवादात्मक चर्चा केली. त्यांनी लसीकरण कार्यक्रमाबद्दलच्या प्रश्नांची उतरे देत गैरसमन दूर केले आणि प्रत्येक मुलांसाठी संपूर्ण लसीकरण वेळापत्रक पूर्ण करण्याचे महत्व अधोरेखित केले. दोन प्रमुख विचारवंत सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सनम सेन्द्र आणि शिक्षक श्री. अनीस अहमद यांनी समुदायाला स्वतःची ओळख करून दिली. त्यांनी या उपक्रमात सामील होण्यामागील प्रेरणा सांगितली आणि त्यांच्या भागात लसीकरण जागरुकता वाढवण्याची वचनबद्धता व्यक्त केली.

KDMC Vaccination Campaign
Baby kidnapping case : कल्याण रेल्वेस्थानकातून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण

कार्यक्रमाच्या शेवटी, रॉबिन मार्टिन आणि जीएब्हीआय च्या भेट देणाऱ्या प्रतिनिधींनी ग्रुप चर्चा केली. या चर्चेत त्यांचे क्षेत्रातील अनुभव, शून्य-डोस किंवा आंशिक लसीकरण असलेल्या कुटुंबांना सहभागी करून घेत त्यातील आव्हाने याचा आढावा घेण्यात आला.

ग्रुप चर्चा आणि पुढारी टीमच्या शिष्टमंडळाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यालयाला भेट दिली आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला आणि अधिकारी डॉ. सुहासिनी बडेकर यांची भेट घेतली. कल्याणच्या शहरी समुदायांमध्ये लसीकरण कवरेज सुधारण्यासाठी संभाव्य सहयोगी धोरणे ओळखण्यासाठी आणि पोहोच, समन्वय आणि जमिनीवरील अडथळ्यांबद्दल समजून घेण्यासाठी प्रकल्प अंवर्दष्टी, समुदाय अभिप्राय आणि मीडिया भागीदारीच्या संधी सामायिक करण्यावर या बैठकीत लक्ष केंद्रित केले गेले. या सहभागाने समुदायस्तरीय प्रयत्नांना बळ मिळाले. लसीकरण उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी आणि पुढारी यांच्यात एक मजबूत समन्वय चौकट स्थापित केली. दरम्यान, टीमने जवळच्या कल्याण झोपडपट्टी भागातील नकार दिलेल्या आणि अंशतः लसीकरण झालेल्या मुलांच्या कुटुंबांना भेटण्यासाठी घरगुती भेटी दिल्या. या भेटींमुळे लसीकरणाबद्दलच्या समज गैरसमज दूर करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news