ठाणे : कळवा रुग्णालयातील घटनेची निपक्षपातीपणे चौकशी व्हावी – निलम गोऱ्हे

नीलम गोऱ्हे
नीलम गोऱ्हे

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : कळवा रुग्णालयात घडलेली घटना अतिशय दु:खद आणि धक्कादायक आहे. परंतु, कोविड काळात आणि कोविड नंतर बऱ्याचशा अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना जीव गमावण्याची वेळ येते याची वस्तुस्थिती काय आहे? हे का घडलं? याच्या खोलामध्ये जाणे गरजेचे आहे. सरकाराने नेमलेल्या समितीचा अहवाल जरी आला तरी एखादी दुर्घटना झाल्यानंतर ही त्यावर कारवाई होतेच असे नाही. बराचशा रुग्णालयात सीसीटीव्ही लावलेले असतात. मात्र, त्यांचे निरीक्षण आरोग्य व्यवस्थेने करणे गरजेचे आहे. रुग्णालयात औषधांचा साठा पुरेसा नसल्याने काही वाईट परिणाम झाला आहे आहे का? हे समजून घेणे महत्वाचे असते. परंतु, हे सर्व समितीच्या अहवालात दिसेल. मात्र या प्रकराची निपक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी अपेक्षा विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. शुक्रवारी त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कळवा रुग्णालयातील घटनेसंदर्भात एक बैठक घेतली. या बैठकीला चौकशी समितीमधील पदाधिकारी, कळवा रुग्णालयातील डॉक्टर देखील उपस्थित होते.

निलम गोऱ्हे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात गांभीयार्ने लक्ष दिले असल्याचे सांगत, येथील आरोग्य व्यवस्था सुधारावी यासाठी निधी आणि मनुष्यबळासाठी कशी चालना देता येईल. विधान परिषदेच्या उपसभापती या नात्याने आणि ठाणेकरांना कशी मदत करता येईल हाच माझा हेतू आहे, असेही त्या या वेळी बोलताना म्हणाल्या.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news