Australia Team : वनडे वर्ल्डकपपूर्वी कांगारू संघाला मोठा धक्का, स्टिव्ह स्मिथ-मिचेल स्टार्कची अचानक माघार | पुढारी

Australia Team : वनडे वर्ल्डकपपूर्वी कांगारू संघाला मोठा धक्का, स्टिव्ह स्मिथ-मिचेल स्टार्कची अचानक माघार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियन संघाला (Australia Team) मोठा धक्का बसला आहे. संघाचे दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल स्टार्क हे दुखापतींमुळे आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर पडले आहेत. मात्र, ऑक्टोबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी ते पूर्णपणे तंदुरुस्त होतील अशी अपेक्षा आहे.

स्टीव्ह स्मिथ हा यापुढे टी-20 फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज असेल. नुकतीच याबाबत ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले होते. पण मनगटाच्या दुखापतीमुळे त्याने द. आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली आहे. तो कमीत कमी एक महिना क्रिकेट खेळू शकणार नसल्याचे समजते आहे. दुसरीकडे ग्रोईन इंजुरीचे कारण देत मिचेल स्टार्क या दौऱ्यातून बाहेर पडला आहे.

दरम्यान, स्मिथने माघार घेतल्यामुळे आता वनडे व टी-20 अशा दोन्ही मालिकांमध्ये अष्टपैलू मिचेल मार्श हा ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करताना दिसेल. स्मिथच्या जागी वनडे संघात मार्नस लॅब्युशेन तर टी-20 ॲश्टन टर्नर त्याची जागा घेईल. वनडे संघात मिचेल स्टार्क याच्या ऐवजी स्पेन्सर जॉन्सन याला संधी देण्यात आली आहे. वनडे संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स आधीच दुखापतग्रस्त आहे. तो मनगटाच्या दुखापतीमुळे पुढील एक महिनाभर मैदानाबाहेर असेल. त्यामुळे त्याने यापूर्वीच द. आफ्रिका दौऱ्यात सहभागी होण्यास नकार दिला होता.

ऑस्ट्रेलिया टी-20 संघ :

मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अबॉट, जेसन बेहरनडॉर्फ, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, ॲरोन हार्डी, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, ॲश्टन टर्नर, ॲडम झम्पा.

ऑस्ट्रेलिया वनडे संघ :

मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अबॉट, ऍश्टन अगर, ॲलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झम्पा

Back to top button