Thane Crime : ठाण्यातील भोंदूबाबाची गोव्यामध्ये अय्याशी !

एका रात्रीत कॅसिनोवर उडवले तब्बल 14 लाख रुपये ; सोबत रशियन, कझाकिस्तानी तरुणींचा घोळका
Thane fake godman Goa scandal
भोंदू बाबा मंजुनाथ सुंदर शेट्टीpudhari photo
Published on
Updated on

ठाणे : नाशिकपाठोपाठ आता ठाण्यात उच्चभ्रू वस्तीतील भोंदू बाबा मंजुनाथ सुंदर शेट्टी ऊर्फ दीक्षित बाबाचे प्रकरण समोर आले असून, कॅसिनोंवर अय्याशी करणाऱ्या या बाबाला ठाणे पोलिसांनी गोव्यात बेड्या ठोकल्या आहेत. हाय-प्रोफाईल जीवनशैलीमुळे त्याला ‌‘कॅसिनो बाबा‌’ हे नाव पडले आहे.

हा भोंदू बाबा मूळचा कर्नाटकातील असून, तो पीडितांना काळ्या जादूची भीता दाखवून लाखो रुपये लुटत होता. मुख्य म्हणजे तो कॅसिनोप्रेमी असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तो विमानाने प्रवास करून गोव्यातील आलिशान हॉटेल्समध्ये राहायचा. त्याच्यासोबत रशियन आणि कझाकिस्तानमधील तरुणींचा वावर असायचा. या बाबाला पोलिसांनी तपासासाठी गोव्यातील संबंधित कसिनोमध्ये नेले, तेव्हा तिथले कर्मचारीही त्याचा हा अवतार पाहून अवाक झाले.

Thane fake godman Goa scandal
Sangli fraud : पोलिस कॅन्टीन अपहार; तपास थांबवण्याचा डाव?

तो अघोरी पूजा करण्यासाठी पीडितांना घेऊन गोव्याला जायचा. मात्र, तिथे गेल्यावर तो कोणतीही पूजा न करता पीडितांकडून घेतलेले पैसे गोव्यातील पंचतारांकित हॉटेल्स आणि कॅसिनोमध्ये उडवायचा. एका रात्रीत तब्बल 14 लाख रुपयांचे बिल त्याने एका कॅसिनोत भरल्याचे तपासात उघड झाले आहे. या सर्व प्रकारांनी यासंदर्भात तपास करणारे पोलीसही चक्रावून गेले आहेत.

बाबाच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये

या प्रकरणात गोव्यातील एका कॅसिनो मॅनेजरचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. बाबाच्या बँक खात्यात अनेकांनी लाखो-कोट्यवधी रुपये पाठवल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. तपासात त्याच्याकडून 12 तोळे सोने आणि एक लाखाची रोकड जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Thane fake godman Goa scandal
Smuggling Case : तस्करीच्या गुन्ह्यात अटकेची भीती, अल्पवयीन मित्राकडून दागिने लुबाडले

अघोरी पूजा करा, धनदौलत मिळवा

सदर भोंदू बाबा प्रामुख्याने श्रीमंत लोकांना आपले लक्ष्य बनवत असे. तुमच्यावर कोणीतरी काळी जादू केली आहे, तुम्ही लवकरच मरणार आहात किंवा अघोरी पूजा केल्यास तुम्हाला अमाप धनदौलत मिळेल, असे सांगून तो लोकांना जाळ्यात ओढायचा. मूल होत नसलेल्या जोडप्यांनाही तो पूजेचे आमिष दाखवून लुबाडायचा आणि पूजेच्या नावाखाली चांगली गलेलठ्ठ रक्कम उकळत असे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news