Thane Fake Currency Case : वडापाव खरेदी करताना बनावट नोटा दिल्या; तरुण जाळ्यात

१२ बनावट नोटा जप्त; श्रीनगर पोलिसांची कारवाई
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे : वडापाव खरेदीसाठी पाचशे रुपयांची बनावट नोट देणे अंधेरीतील तरुणाला चांगलेच महागात पडले. वागळे इस्टेटमधील पडवळ नगर परिसरात वडापाव विक्रेत्याला बनावट नोट देऊन पसार झालेल्या समिती फारूक सय्यद (२८) याला श्रीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या १२, म्हणजेच सहा हजार रुपये किमतीच्या संशयित बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

वागळे इस्टेटमधील पडवळ नगर येथे नितीन गावड यांचा वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास एक तरुण त्यांच्या गाडीवर आला. त्याने सहा वडापाव मागवून पाचशे रुपयांची नोट दिली. घाईत गावड यांनी त्याला ४०० रुपये परत केले. वडापाव तयार ठेवण्यास सांगून तो तरुण तेथून निघून गेला.

Crime News
Ulhasnagar Municipal Corporation Diwali Bonus : उल्हासनगर पालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसवरून संघर्ष

दरम्यान, रात्री नऊच्या सुमारास बनावट नोट देण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला परिसरातील नागरिकांनी पकडले. त्याला नितीन गावड यांच्याकडे आणल्यानंतर नोट तपासली असता ती बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. श्रीनगर पोलिसांनी तरुणाची झडती घेतली असता त्याच्या खिशात पाचशे रुपयांच्या १२ संशयास्पद नोटा आढळल्या.

पोलिसांनी या नोटा जप्त करून समिती फारूक सय्यद याच्याविरोधात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Crime News
Matheran Horse Association Protest : माथेरानमध्ये घोडेबंद आंदोलन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news