Matheran Horse Association Protest : माथेरानमध्ये घोडेबंद आंदोलन

बेमुदत उपोषणाचा अश्वपाल संघटनेचा इशारा
Matheran Horse Association Protest
Matheran Horse Association Protest pudhari photo
Published on: 
Updated on: 

माथेरान : मिलिंद कदम

माथेरानमधील रस्ते व इतर मागण्या मान्य होत नसल्याने येथील अश्वपाल संघटनेने आजपासून घोडे बंद आंदोलनास सुरवात केली असून आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले आहे. या मागण्या मान्य न झाल्यास उद्यापासून बेमुदत उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदनामध्ये अश्वपाल संघटनेने माथेरानमध्ये सुरू असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हे खंडाळा पॉईंट रोडपर्यंतच्या क्ले पेव्हर ब्लॉकच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून हे ब्लॉक लावताना निवेदेनुसार काम होत नसून चालढकल करून काम संपवण्याचे सुरू असल्याचे दिसत असल्याने तात्काळ हे काम बंद करण्याची मागणी केली आहे.

Matheran Horse Association Protest
Pradeep Purnekar Case : फक्त चौकशी... गूढ मात्र उकलेना

त्याचप्रमाणे मागील काही महिन्यांमध्ये येथील पाणीपुरवठा करणारा शार्लेट लेक तलाव स्वच्छ करण्यात आला होता व निवेदेनुसार यामध्ये असलेले दगड माती जमा करून रस्त्यांच्या कामांना व इतर कामास वापरण्यास सांगितले गेले होते परंतु यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत असल्याने ही माती कुठे वापरली गेली याची माहिती मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे, अनेक ठिकाणी हेरिटेज असलेल्या बंगल्यांची कामे सुरू आहेत किंवा झालेली आहेत, यांना परवानगी देताना काय निकष लावले गेले याचीही माहिती मागितली गेली आहे,

येथील प्रवेशद्वार दस्तुरी नाका ते सखाराम तुकाराम पॉईंट, हार्ड पॉईंट कडे जाणारा रस्ता तसेच रीगल नका ते इको पॉईंट व इतर सर्व रोड यावर बसवण्यात आलेली क्ले पेव्हर ब्लॉक का काढण्यात आले नाहीत याचे लेखी उत्तर मागण्यात आले आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सर्व वीस रिक्षा अजूनपर्यंत चालू असून त्या २० रिक्षा बंद करून तेरा गरजू हात रिक्षा चालकांना का देण्यात आलेल्या नाही व वीसच्या ऐवजी २६ रिक्षा कशा झाल्या याबाबत सविस्तर माहिती निवेदनाद्वारे मागितली गेली आहे.

Matheran Horse Association Protest
Chhatrapati Sambhajinagar Water conservation Kannad|दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य

त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी घोडा स्टॅन्ड मोडकळीस आलेले आहे याची त्वरित दुरुस्ती व्हावी व प्रेक्षणीय स्थळांकडे जाणाऱ्या फलकांवर चुकीचे माहितीपत्रक असल्याचे दिसून आले असल्याने त्यामध्ये तात्काळ दुरुस्ती व्हावी अथवा फक्त नाम फलक टाकण्यात यावे याची मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटी घेऊनही अश्वचालकांच्या समस्या वाढतच आहेत, बसवण्यात आलेल्या क्ले पेव्हर ब्लॉकचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचा आम्ही वारंवार सांगून ही त्यावर कारवाई होत नाही, अश्वचालकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामुळे अखेरचा उपाय म्हणून आम्हाला आता बेमुदत बंद करावा लागत आहे, जोवर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा बंद सुरूच राहील.

आशा कदम, अध्यक्षा, स्थानिक अश्वपाल संघटना, माथेरान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news