डोंबिवली: पुढारी वृत्तसेवा: डोंबिवलीजवळच्या मानपाडा (माणगाव) मध्ये गतिमंद मुलीची बापाने खून केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास ड्रायव्हरचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. कल्याण-भिवंडीला जोडणाऱ्या पुलावर नादुरूस्त झालेल्या डंपरची पाहणी करत असतानाच या डंपरच्या ड्रायव्हरची धारदार शस्त्राने खून करण्यात आला. Thane crime news
कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी पुलावर सोमवारी पहाटेच्या सुमारास एका डंपर ड्रायव्हरचा निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भोलाकुमार महंतो असे या ड्रायव्हरचे नाव आहे. या घटनेची माहिती कळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर डंपरचा ड्रायव्हर भोलाकुमार याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रूक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवून दिला. हा डंपर कुठून कुठे चालला होता ? हा डंपर चालविणाऱ्या ड्रायव्हरचा खून कुणी केली ? यामागचे कारण काय असू शकते ? याचा तपास सुरू केल्याचे पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी सांगितले. Thane crime news
भोलाकुमार पहाटेच्या सुमारास डंपर घेऊन शहाडच्या दिशेने जात होता. दुर्गाडी पुलावर डंपरच्या टायरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे डंपर बाजूला घेऊन भोलाकुमार पाहणी करण्यासाठी खाली उतरला. याच दरम्यान दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी चाकूने भोसकून त्याचा खून केला. रक्ताच्या थारोळ्यात तडफडत भोलाकुमार ठार झाल्याचे पाहून हल्लेखोर तेथून पसार झाले. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हल्लेखोर खुन्यांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा