Crime News : ठाण्यात राडा करणाऱ्या नातेवाइकांनाही पोलिसांचा दणका

विद्यार्थिनींची छेडछाड प्रकरण
Crime News
Crime News : ठाण्यात राडा करणाऱ्या नातेवाइकांनाही पोलिसांचा दणकाfile photo
Published on
Updated on

Crime News: Police also crack down on relatives who staged a protest in Thane

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बीबी का मकबरा परिसरातील हनुमान टेकडीवर उच्चशिक्षित विद्यार्थिनींची छेड काढून तिच्या मित्रावर हल्ला करणाऱ्या चार टवाळखोरांना पकडल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी पोलिस ठाण्यात राडा घालणाऱ्या नातेवाइकांनाही पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. ठाण्यात घुसून महिला पोलिसांशी हुज्जत घालणे, त्यांची कॉलर पकडणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पाच नातेवाइकांसह इतर महिलांवर बेगमपुरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Nida Khan arrested TCS case : नगरसेवक मतीन पटेलला सोबत घेऊनच रात्री फ्लॅटवर टाकली धाड

शनिवारी (दि. १८) रात्री साडेआठ ते पावणेनऊ वाजेच्या सुमारास हा संतापजनक प्रकार घडला होता. हनुमान टेकडीवरील छेडछाड प्रकरणात पोलिसांनी आरोपी सूरज सतीश साळवे (२०, रा. प्रगती कॉलनी), आकाश राजू म्हस्के (२३, रा. श्रावस्ती कॉलनी), ऋषिकेश रतन नवगिरे (२१) आणि आदर्श ईश्वर वाकेकर (२०, दोघे रा. जयभीमनगर, टाऊन हॉल) या टवाळखोरांना अटक केली होती.

त्यांना बेगमपुरा ठाण्यात आणून त्यांची कायदेशीर चौकशी सुरू असतानाच आरोपींच्या नातेवाइकांनी गैरकायद्याची मंडळी जमवून थेट ठाण्यात प्रवेश केला. संशयितांवर कोणतीही कारवाई न करता त्यांना थेट आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत या आक्रमक जमावाने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

Crime News
Sharpshooters Arrested | दोन कुख्यात शार्पशूटर्सना कोल्हापुरात ठोकल्या बेड्या

ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक मदेवाड यांच्यासह अंमलदार कोहचाडे आणि खान यांना लोटलाट केली. एवढेच नाही तर कर्तव्यावर असलेल्या महिला अंमलदार उज्ज्वला राठोड आणि सोनवणे यांच्या थेट अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली. या दोघींना सोडवण्यासाठी पुढे आलेले पुरुष अंमलदार नलावडे, चव्हाण आणि ठाकूर यांच्याशीही जमावाने गैरवर्तन करून शासकीय कामात मोठा अडथळा निर्माण केला.

पाच आरोपींना तीन दिवसांची कोठडी

या राड्याप्रकरणी महिला पोलिस अंमलदार छाया शिरसे यांच्या तक्रारीवरून आरोपी अजय अशोक जाधव, गौतम रामभाऊ जाधव, ईश्वर जानकीराम वाकेकर, आरती अजय जाधव आणि स्वाती गौतम जाधव (सर्व रा. बेगमपुरा, शताब्दीनगर व टाऊन हॉल परिसर) यांच्यासह इतर अज्ञात महिलांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही आरोपींना अटक करून रविवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तर छेडछाड करणाऱ्या चारही आरोपींची हर्सल कारागृहात रवानगी झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली. अधिक तपास श्रेणी उपनिरीक्षक गोमटे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news