Corporator Sahar Sheikh | 'कैसे हराया' फेम नगरसेवक सहर शेखचे वडील मुंब्रा पोलीस ठाण्यात हजर

पोलीस युनुस इक्बाल शेख यांचा जबाब नोंदवून घेणार
Sahar Sheikh Father Police Station
Sahar Sheikh Father Police Station Pudhari
Published on
Updated on

Thane Corporator Sahar Sheikh Father Police Station

ठाणे : मुंब्रा येथील एआयएमआयएम पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनुस इक्बाल शेख हे अखेर शुक्रवारी (दि.१७) सकाळी मुंब्रा पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले. बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी सहर शेख विरोधात मुंब्रा पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या घटनेत पोलीस युनुस इक्बाल शेख यांचा जबाब नोंदवून घेणार आहेत.

मुंब्रातील एआयएमआयएम पक्षाच्या नगरसेविका सहर शेख या 'कैसे हराया' या एका वक्तव्यामुळे राज्यभर चर्चेत आल्या होत्या. दरम्यान, शेख विरोधात निवडणूक प्रक्रियेवेळी बोगस जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप आहे.

Sahar Sheikh Father Police Station
Who is Sahar Sheikh: मुंब्र्यातील MIMची नगरसेविका सहार शेख कोण आहे? वय, शिक्षण, व्यवसाय आणि संपत्ती जाणून घ्या

याप्रकरणी ठाणे तहसीलदारांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार मुंब्रा पोलिसात फसवणुकीची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार मुंब्रा पोलिसांनी बनावट दस्तावेज प्रकरणी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहावे अशी नोटीस सहर शेख यांना बजावली होती.

मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सहर शेख नॉट रीचेबल होत्या. त्यामुळे त्या गायब झाल्याची जोरदार चर्चा रंगली होती. अखेर सहर शेखचे वडील युनुस इक्बाल शेख हे शुक्रवारी सकाळी मुंब्रा पोलीस ठाण्यात हजर झाले. बनावट दस्तावेज प्रकरणात त्यांचा जबाब पोलीस नोंदवून घेणार आहेत.

Sahar Sheikh Father Police Station
Thane Voter List: ठाणे जिल्ह्यात मतदार मॅपिंग मोहिमेला गती

सहर शेख यांचे कुटूंबीय मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे रहिवासी आहेत. शेख यांनी ठाणे मनपा निवडणुकी दरम्यान महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे दाखवून बनावट दस्तावेज सादर करून जात प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news