

रायगड ः रायगड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणूकीत महाड आणि खोपोली येथे घडलेल्या गंभीर स्वरुपाच्या राजकीय गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषद आणि 15 पंचायत समीत्याच्या निवडणूकीकरिता रायगड जिल्हा पोलीसांनी विशेष सतर्क होवून मोठ्या प्रमाणत प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या अंतर्गत आता पर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 184 समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे, तर 18 जणांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रिव्हेंन्शन ऑफ डेंजरस अक्टीव्हीटी (एमपीडीए) कायद्यान्ये एकावर कारवाई करण्यात आली आहे.
नगरपालिका निवडणूक काळात शस्त्रांचा वापर केल्याचेही समोर आहे. निवडणूक काळात अधिकृत परवाना असलेली शस्त्रे देखील पोलीस प्रशासनाकडे जमा केली जातात.त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परवानाधारकांची 1 हजार 429 शस्त्रे पोलिसांनी जमा करुन घेतली आहेत.
दरम्यान नगरपालिका निवडणूकीत घडलेल्या गुन्ह्यात जिल्ह्यातील मतदार नसलेले आरोपी निष्पन्न झाले होते. या पार्ऱ्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद निडणूकीच्या निमीत्ताने उभारलेल्या विशेष पोलीस तपासणी नाक्यावर जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी देखील करण्यात येत आहे.
महाड आणि खोपोली नगरपालिका निवडणुकीती राजकीय वाद आणि वैमनस्यातून गुन्हे घडले असल्याचे विचारात घेऊन रायगड पोलिसांनी ही व्यापक स्वरुपाची कारवाई केली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या59 गट, पंचायत समितीच्या 118 गणासाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान तर 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निडणूकीच्या प्रचारा वेग आला आहे. निवडणुकीसाठी प्रशासकीय व पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. निवडणूक कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक उपाययोजना सुरू केल्या आहेत.