Biodiversity of Tala : तळ्यातील रस्त्याच्या कडेला, जंगल भागात बहरला ‌‘पळस‌’

रानमाळावर पळसाचे झाड नारिंगी फुलांनी बहरलेले बघुन वृक्षप्रेमी त्या झाडाकडे आकर्षित होतात
Biodiversity of Tala
तळ्यातील रस्त्याच्या कडेला, जंगल भागात बहरला ‌‘पळस‌’ pudhari photo
Published on
Updated on

तळा : तळा तालुका हा वनसंपदेने नटलेला तालुका आहे. तेथे प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळ व फुले येतात. आता तर पळसाची झाडे हि नारंगी फुलांनी बहरलेली दिसत आहेत. रानमाळावर हे पळसाचे झाड नारिंगी फुलांनी बहरलेले बघुन वृक्षप्रेमी त्या झाडाकडे आकर्षित होतात.व आपल्या कॅमेऱ्यात नारंगी फुलांची जणू उधळण केलेल्या झाडाचे फोटो काढतात.

पळस हि एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या झाडाच्या पानांचा आकार हा तळहाता एवढा रुंद व जाड असतो. त्यांचा वापर पत्रावळी करण्यासाठी करतात. पूर्वी मोठमोठ्या कार्यक्रमात या पानांपासून बनविलेल्या पत्रावळीचा वापर होत होता.

Biodiversity of Tala
माऊली

परंतू आता यूज ॲण्ड थ्रोचा फॅड असल्यामुळे ह्या पानांपासून बनविलेल्या पत्रावळी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु तळा तालुक्यातील काही गावात आजही या पानांच्या पत्रावळी बनवितात. याच्या फुलांचा वापर पुर्वी रंग बनविण्यासाठी करत होते. याच्या बिया खुप कडू असतात. त्याला पळसपापडी.म्हणतात त्याचा औषधी उपयोग आहे. असे जुने जाणकार सांगतात.

Biodiversity of Tala
Raigad Crime : रेवदंड्यात जावयाने केला सासूचा खून

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news