ठाणे : बार चालकाकडून ग्राहकास मारहाण; गुन्हा दाखल

ठाणे : बार चालकाकडून ग्राहकास मारहाण; गुन्हा दाखल

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : बिलावरून झालेल्या वादात बारचालकाने ग्राहकास बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली येथील एका बारमध्ये बिलाचे पैसे देण्यावरुन रात्री उशिरापर्यंत वाद सुरू होता. हा प्रकार आजदे येथील आशिष बारमध्ये घडला.

याबाबत अधिकची माहिती अशी की,  सुरज गिरी हा त्याच्या मित्रासोबत आजदे येथील आशिष बार येथे मंगळवारी (दि.२९) रात्री अकरा वाजता दारू पिण्यास गेले होते. या वेळी हा प्रकार घडला. दरम्यान, सुरज गिरी याचे वडिल आणि भाऊ त्याला वाचवण्यासाठी बारमध्ये आले असता त्यांनाही बारमालकाने मारहाण केली. यानंतर सुरज गिरी याने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. मानपाडा पोलीस ठाण्यात 'आशिष बार'च्या मालकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. तर सुरज आणि धीरज गिरी या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news