Thane Attempted Murder: अर्धवट घरकामाच्या पैशावरून थेट प्राणघातक हल्ला; कोयता-कुकरने मारहाण

ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळ; एक जखमी आयसीयूमध्ये, तिघांविरोधात गुन्हा
Attempted Murder
Attempted Murderfile photo
Published on
Updated on

ठाणे : घराचे अर्धवट केलेल्या कामाचे पैसे मागावयास गेल्यानंतर झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर कोयता आणि कुकरच्या साह्याने प्राण घातक हल्ला करून जीव ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 30 जानेवारी 2026 रोजी घडली. तक्रारदार शिवा देवरस यांनी याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला. तक्रारीत देवरस यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चेन गहाळ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Attempted Murder
Thane Prosecutor Bribery:लाच प्रकरणात सरकारी वकील दोषी : संध्या बच्छाव यांना 6 महिन्यांचा कारावास

ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वागळे इस्टेट किसननगर 2 येथे राहणारे तक्रारदार शिवा सोन्या देवरस (25) यांनी दिलेल्या तक्रारीत,जखमी प्रकाश जाधव यांनी वारली पाडा येथे राहणाऱ्या लक्ष्मण भालशंकर याला घराच्या डबल माळ्याचे काम दिले होते. मात्र सदर काम अर्धवट राहिल्याने उर्वरित कामाचे पैसे देण्याचे लक्ष्मणने कबूल केले होते. त्यानुसार 30 जानेवारी रोजी सुमारे पावणेबारा वाजण्याच्या सुमारास दोघे दुचाकीवरून वारली पाडा येथे लक्ष्मणच्या घरी गेले. लक्ष्मणच्या घरी पोहोचल्यानंतर सुरुवातीला त्याने दोन-तीन दिवसांत पैसे देण्याचे सांगितले. मात्र काही क्षणांतच लक्ष्मण व त्याच्यासोबत आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी अचानक आक्रमक भूमिका घेतली. लक्ष्मणने प्रकाश जाधव यांना जोरात धक्का देऊन खाली पाडले व घरातील कुकरने डोक्यात व शरीरावर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी सोबत असलेल्या जाडसर व्यक्तीने शिवा देवरस यांनाही मारहाण केली.

Attempted Murder
TWJ Scam Maharashtra: टीडब्ल्यूजे घोटाळा उघड : 11 हजार गुंतवणूकदारांची 1,200 कोटींची फसवणूक, मालक दाम्पत्यासह तिघांना अटक

हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी प्रकाश जाधव व तक्रारदार शिवा देवरस हे घराबाहेर पळून गेले. मात्र लक्ष्मण भालशंकर व त्याचे दोन साथीदारांनी त्यांचा पाठलाग करून जवळील मैदानाजवळ त्यांना गाठले. तेथे जाडसर व्यक्तीने कोयत्याने जाधव यांच्या कपाळावर, उजव्या भुवईवर व नाकावर वार केले. या हल्ल्यात प्रकाश जाधव यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चेनही गहाळ झाली आहे. या मारहाणीत जाधव यांना गंभीर दुखापत झाल्याने जखमी अवस्थेत जाधव यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लक्ष्मण भालशंकर व त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलझारीलाल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news