ठाणे : चोरी केलेल्या रिक्षा, मोटरसायकलची विक्री करणाऱ्यास अटक

अटक
अटक

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : रिक्षा आणि मोटरसायकल चोरून त्या विकण्याच्या तयारीत असणाऱ्या एका आरोपीस मानपाडा पोलिसांनी अटक केली. डोंबिवली पूर्व परिसरातील कांचनगाव येथील रहिवासी असणारा आकाश ढोणे (वय १९) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ५ रिक्षा आणि ५ मोटरसायकल असा एकूण ५ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडल्याने वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाखाली मोटार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विविध पोलीस पथके स्थापन करण्यात आली आहे. मानपाडा पोलिसांच्या पथकांनी मोटार वाहने चोरी झालेल्या भागात गस्त घालून संशयित इसमावर पाळत ठेवली होती. त्यानुसार संशयित आरोपी आकाश पोलिसांच्या नजरेस पडला. त्याची चौकशी केली असता तो घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्याला मानपाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता मानपाडा पोलीस ठाणे, मुंब्रा पोलीस ठाणे, महात्मा फुले चौक पोलीस ठाणे, भिवंडी येथील शांतीनगर पोलीस ठाणे या हद्दीतून रिक्षा व मोटारसायकल चोरी करून त्या विक्री करण्यासाठी गिऱ्हाईक शोधत असल्याचे त्यांने सांगितले.

त्याने डोंबिवली पूर्व येथील निळजे गाव परिसरातील माऊली तलावाच्या बाजूस असलेल्या झाडाझुडपात तसेच डोंबिवली पूर्व परिसरातील खंबाळपाडा मॉडेल कॉलेजच्या मैदानातील झाडाझुडपात चोरलेल्या रिक्षा व मोटारसायकली लपवून ठेवल्याचे सांगितले. या सर्व रिक्षा व मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या असून पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल भिसे, पोलीस उपनिरीक्षक कुणाल गांगुर्डे आणि मानपाडा पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांनी ही कारवाई केली.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news