Thane News: भूमाफियांकडून वास्तुविशारद संदीप पाटील यांच्या जीवाला धोका; अज्ञातांकडून घरावर पाळत

Thane News: भूमाफियांकडून वास्तुविशारद संदीप पाटील यांच्या जीवाला धोका; अज्ञातांकडून घरावर पाळत
Published on
Updated on


सापाड: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यासाठी आक्रमक पुढाकार घेणारे वास्तु विशारद संदीप पाटील यांना भूमाफियांकडून धमक्या येत आहेत. मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन भूमाफियांनी पाटील यांच्या घर परिसरात जाऊन त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. सोसायटीच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. या सर्व प्रकरणाची तक्रार वास्तु विशारद पाटील यांनी राज्याचे गृह विभागाचे प्रधान सचिव पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे. आपल्या जीवाला काही झाल्यास त्याची जबाबदारी शासनाची असेल असे पाटील यांनी गृह विभागाच्या प्रधान सचिवांना कळविले आहे. Thane News

चार दिवसापूर्वी डोंबिवलीत बेकायदा बांधकामाशी संबंधित विषयावरून एका जणावर हल्ला करण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असताना आता 65 बेकायदा बांधकामे, नियमबाह्य दस्त नोंदणीच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेणाऱ्या संदीप पाटील यांना भूमाफियांकडून लक्ष करण्यात येत असल्याने शहरातील प्रतिष्ठित नागरिक, विकासक, वास्तु विशारद संस्थाकडून याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. Thane News

गेल्या वर्षापासून पाटील हे ठाणे पोलीस आयुक्तांकडे पोलीस संरक्षण स्वसंरक्षणासाठी परवानाधारी बंदूकसाठी प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांच्या दोन्ही मागण्या यापूर्वीच फेटाळण्यात आल्या आहेत. हा विषय पाटील यांनी गृह विभागाच्या निदर्शनास आणला आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होम माने यांनी पाटील यांना संरक्षण देण्याचे, त्यांच्या घर परिसरात गस्त घालण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे पाटील यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी होममन यांना संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

संदीप पाटील यांनी 27 गावातील अनधिकृत बांधकामाविरोधात मोहीम सुरू केली होती. या मोहिमेच्या माध्यमातून 27 गावातील दस्त नोंदणी गेल्या अनेक वर्षांपासून बंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अर्धवट कल्याण शील रोडवरील टोल वसुली ही बेकायदेशीर असल्यामुळे त्या विरोधात देखील पाटील यांनी आवाज उठवून टोल वसुली बंद केली. आधारवाडी डम्पिंग ग्राउंड याविषयी देखील पाटील यांनी याचिका दाखल करून डम्पिंग ग्राउंड बंद केले. महाराष्ट्रातील आमदारांच्या पेन्शन वाढ व वेतन वाढच्या विरोधात देखील पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याचबरोबर बनावट कागदपत्रांच्या आधारे रेरा प्रमाणपत्र मिळवून रजिस्ट्रेशन करण्यासंदर्भात देखील उच्च न्यायालयात पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यामुळे सत्तावीस गावातील बेकायदेशीर बांधकाम करणारे अनेक बिल्डर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कल्याण डोंबिवलीतील डीपी रस्त्यामध्ये येणाऱ्या अनाधिकृत बांधकामांना निष्कर्षित करण्यासाठी पाटील यांनी पावले उचलली असून या विरोधात देखील आपला लढा तीव्र केला आहे. तसेच बी.एस.यु.पी. योजनेत झालेल्या भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी जनहित याचिका दाखल करून मुंबई शहर दिवाणी व सत्र न्यायालय यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची गठित समिती करून त्यावर बीएसयुपी प्रकरणातील अनियमितता कामाचा शोध सुरू करण्यात आला आहे. डोंबिवली येथील उद्यान आरक्षणाच्या जागेवर अनधिकृत इमारत बांधण्यात आली आहे. या संदर्भात पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावरून न्यायालयाच्या निर्देशानुसार अनधिकृत इमारत पूर्णपणे निष्कासित करण्यात आली.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news