या गुन्ह्यांमुळे महेश यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आरोपींमध्ये महेश गायकवाड, यशवंत फुलोरे, रोहिदास फुलोरे, गणेश यशवंत फुलोरे, शेवंतीबाई मुका फुलोरे यांचा समावेश आहे. नुकताच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्यानंतर महेश २५ दिवस ठाण्यातील रुग्णालयात उपचार घेत होते. आताच ते सुस्थितीत होऊन विकास कामे मार्गी लावण्यासाठी सक्रिय झाले आहेत. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील बांधकाम व्यावसायिक सदृध्दीन बशर खान यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांची एफएस ग्रुप ऑफ कंपनीज ही बांधकाम कंपनी आहे. ऑगस्ट २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत हा खंडणी मागण्याचा प्रकार घडला आहे.