Las Kalyanachi Vaccination Awareness: ठाकुर्ली चोळेगाव वस्तीत ‌‘लस कल्याणाची‌’ उपक्रमातून लसीकरण जनजागृतीला मोठी चालना

Las Kalyanachi Pudhari ZMQ NGO Initiatives: झेड.एम.क्यू. एनजीओ आणि पुढारी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जानेवारी रोजी ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील चोळेगाव बस्तीत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
Las Kalyanachi Pudhari ZMQ NGO Initiatives
Las Kalyanachi Pudhari ZMQ NGO InitiativesPudhari
Published on
Updated on

Las Kalyanachi Pudhari ZMQ Development NGO

सापाड : योगेश गोडे

लहान बालकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी नियमित व वेळेवर लसीकरण अत्यंत आवश्यक असून, समाजाचा सक्रिय सहभाग हाच लसीकरण यशस्वी होण्याचा कणा आहे. या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या “लस कल्याणाची” या समुदायाधारित लसीकरण जनजागृती उपक्रमांतर्गत झेड.एम.क्यू. एनजीओ आणि पुढारी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जानेवारी रोजी ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील चोळेगाव बस्तीत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून लसीकरणाबद्दल समाजात असलेले गैरसमज दूर करून, लसीकरणाची भीती आणि अफवा दूर करणे होय, लसीकरणाविषयी माता-भगिनींसह पालकां -मध्ये विश्वास निर्माण करून प्रत्येक बालकाचे नियमित आणि वेळेवर लसीकरण करणे हा महत्वाचा उद्देश आहे. या चर्चासत्रांमध्ये 55 महिला भगिनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

“लस कल्याणाची” हा उपक्रम केवळ माहिती देण्यापुरता मर्यादित नसून, समुदायातील विश्वासार्ह व्यक्तींच्या माध्यमातून लसीकरणाचा संदेश घराघरात पोहोचवण्यावर भर देतो. याच अनुषंगाने या कार्यक्रमात स्थानिक की-ओपिनियन लीडर्स (घजङी) म्हणून आरती राजभर, सोनाली सोनावणे, शारदा चौधरी आणि गौरी कैलाशिया या सक्रियपणे सहभागी झाल्या. या सर्व घजङी यांनी सहभागी नागरिकांशी संवाद साधत ‌‘लस कल्याणाची‌’ उपक्रमाची संकल्पना, उद्दिष्टे आणि प्रत्यक्ष क्षेत्रात होणारे फायदे समजावून सांगितले. तसेच या उपक्रमाशी जोडल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या विचारांमध्ये आणि कृतीत कसा सकारात्मक बदल झाला, हे अनुभवही त्यांनी उपस्थितांसमोर मांडले.

Las Kalyanachi Pudhari ZMQ NGO Initiatives
Artists Welfare Project : चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या कोंडीत अडकली कलाकारांच्या वृद्धाश्रमाची पायाभरणी

लसीकरणाबाबत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न

कार्यक्रमादरम्यान लसीकरणासंबंधी समाजात पसरलेल्या अनेक गैरसमजांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. लसीकरणामुळे ताप येतो, लस घेतल्याने मूल आजारी पडते किंवा लस आवश्यक नाही, अशा अफवांमुळे अनेक पालक लसीकरणापासून दूर राहतात. अशा गैरसमजांमुळे बालकांचे आरोग्य धोक्यात येते, हे उदाहरणांसह स्पष्ट केले. यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका व स्वयं-सहायता गटाच्या अध्यक्षा शारदा चौधरी यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी ‌‘लस कल्याणाची‌’ व्हॉट्सॲप गटाचा उद्देश स्पष्ट करत सांगितले की, हा गट केवळ माहिती देण्यासाठी नसून, योग्य व अधिकृत माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी आहे.

पालकांच्या मनातील भीती आणि न्यूनगंड दूर करून त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. तसेच या गटातून मिळणारी माहिती इतर स्वयंसहायता गटांमध्येही पोहोचवली तर त्याचा लाभ संपूर्ण समाजाला होईल, असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमात महिलांचा सहभाग विशेष लक्षणीय ठरला. स्वयंसहायता गट सदस्य आरती राजभर यांनी सांगितले की, ‌‘लस कल्याणाची‌’ उपक्रमाशी जोडल्याने त्यांना लसीकरणाबाबत अधिक स्पष्टता आणि आत्मविश्वास मिळाला आहे. परिसरातील मातांशी संवाद साधताना त्या त्यांच्या मुलांचे लसीकरण झाले आहे की नाही, याची आवर्जून चौकशी करतात.

लसीकरण वेळेवर झाले तरच बालक निरोगी राहू शकते, हा संदेश त्या सातत्याने देत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे सोनाली सोनावणे, दोन महिन्यांच्या बालकाची आई, यांनीही आपला वैयक्तिक अनुभव मांडला. त्यांनी सांगितले की, आई झाल्यानंतर अनेक शंका मनात येतात, मात्र ‌‘लस कल्याणाची‌’ व्हॉट्सॲप ग्रुपमुळे लसीकरणाचे महत्त्व, वेळापत्रक आणि फायदे स्पष्टपणे समजले. लसीकरणामुळे बालक गंभीर आजारांपासून सुरक्षित राहते आणि त्याचा दीर्घकालीन फायदा होतो, असा विश्वास त्यांनी उपस्थित कुटुंबांना दिला.

Las Kalyanachi Pudhari ZMQ NGO Initiatives
Bhiwandi Crime : अल्पवयीन चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस 20 वर्षे कारावास

या चर्चा सत्रांत नचट ऊर्शींशश्रेािशपीं च्या क्षेत्रीय पथकातील रहीम, ज्योती व शोभा यांनी विविध संवादात्मक उपक्रमांचे आयोजन केले. मिथक विरुद्ध वास्तव, योग्य उत्तर निवड उपक्रम, तसेच प्रश्नोत्तर सत्रांमुळे कार्यक्रम अधिक प्रभावी आणि सहभागात्मक ठरला.

“पाच साल, सात बार छूटे ना टीका एक भी बार!”

वरील घोषणेमुळे संपूर्ण परिसरात लसीकरणाचा संदेश उघडपणे पोहोचला. उपस्थित सर्व नागरिकांनाच्या वतीने प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात आल्या. या सत्रांमुळे चोळेगाव बस्तीत लसीकरणाबाबत जागरूकता वाढली असून, समुदायातील संवाद आणि सहभाग अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अशा समुदायाधारित उपक्रमांमुळे लसीकरणाचे प्रमाण वाढण्यास मोठी मदत होते. स्थानिक नेतृत्व, महिला सहभाग, डिजिटल माध्यमांचा वापर आणि आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधून राबवलेले उपक्रम भविष्यात लसीकरण क्षेत्रात आदर्श ठरतील, असा विश्वास अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news