

भिवंडी : भिवंडी शहरातील शहर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत दाखल अल्पवयीन चिमुरडीं -वरील अत्याचाराविरोधात दाखल गुन्ह्याची सुनावणी भिवंडी सत्र न्यायालयात पार पडली. या गुन्ह्यातील आरोपीस 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी शहर पोलीस ठाणे क्षेत्रातील दोन अल्पवयीन पाच वर्षाच्या मुलींवर आरोपी पवनकुमार दिनेशचंद केसरवाणी, (वय 30 वर्ष) हा गैरकृत्य करीत होता.
याबाबत 2020 मध्ये दाखल गुन्ह्याची भिवंडी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश एन. के. कारंडे यांच्या न्यायालयात सरकारी वकील ॲड. सी. बी. नवले व ॲड. व्ही. एम. मुंडे यांनी सरकारी बाजू मांडली तर भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस हवालदार अभिमन्यू पाटोळे, महिला पोलीस शिपाई ए. एस. सगाठीया, समन्स व वॉरंट बजावणारे पोलीस शिपाई मडवी व रामराजे यांनी गुन्ह्यातील पुरावे सादर केल्याने न्यायालयाने आरोपी पवनकुमार यास 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच 5 हजार दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीस सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.