ST Bus Revenue: रक्षाबंधन निमित्त प्रवासी बंधूकडून एसटीला १३७ कोटीची ओवाळणी

एसटीची विक्रमी कमाई; रक्षाबंधन सुट्टीत चार दिवसांत तिजोरीत आले १३७ कोटी रुपये
ST Bus
एसटीला रक्षाबंधनाचा 'गोड' प्रसाद; चार दिवसांत तब्बल १३७ कोटींचे विक्रमी उत्पन्नPudhari Photo
Published on
Updated on

मुंबई: रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्या एसटी महामंडळासाठी 'अच्छे दिन' घेऊन आल्या आहेत. ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांच्या कालावधीत प्रवाशांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने महामंडळाच्या तिजोरीत तब्बल १३७ कोटी ३७ लाख रुपयांची भर पडली आहे. विशेष म्हणजे, ११ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून एसटीने या आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा विक्रम नोंदवला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

ST Bus
Chhava Ride App : एसटी महामंडळ सुरू करणार ‘छावा राईड अ‍ॅप’

या यशाबद्दल बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, "दरवर्षी रक्षाबंधन आणि भाऊबीज या सणांच्या काळात एसटीला विक्रमी उत्पन्न मिळते. या दिवसांत भाऊ-बहिणींच्या प्रवासाची मोठी गर्दी असते. यंदाही प्रवाशांनी एसटीवर दाखवलेल्या विश्वासामुळे महामंडळाने उत्पन्नाचा नवा उच्चांक गाठला आहे."

चार दिवसांतील कमाईचा तपशील:

शुक्रवार: ३० कोटी ०६ लाख रुपये

शनिवार (रक्षाबंधन): ३४ कोटी ८६ लाख रुपये

रविवार: ३३ कोटी ३६ लाख रुपये

सोमवार: ३९ कोटी ०९ लाख रुपये (विक्रमी उत्पन्न)

ST Bus
Pratap Sarnaik | हिंदी तर मुंबईची बोलीभाषा, प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्याने वाद

या चार दिवसांत एकूण १ कोटी ९३ लाख प्रवाशांनी एसटीने सुरक्षित प्रवास केला. विशेष म्हणजे, यामध्ये तब्बल ८८ लाख महिला प्रवाशांचा समावेश होता, जे 'महिला सन्मान योजने'च्या यशाचे द्योतक आहे. प्रवाशांनी दाखवलेल्या या प्रचंड प्रतिसादाबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व प्रवासी आणि अहोरात्र सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news