Sri Lanka Ambedkar Statue |श्रीलंकेत उभारणार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा; भारत-श्रीलंका मैत्रीला नवी उंची

बियागामामध्ये मैत्री सेतू शैक्षणिकसह सांस्कृतिक संकुलाचे दिमाखात भूमिपूजन
Dr Babasaheb Ambedkar Statue Biyagama Sri Lanka
श्रीलंकेतील बियागामा येथे मैत्री सेतू शैक्षणिक व सांस्कृतिक संकुलाच्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान काढण्यात आलेल्या शोभायात्रेत शिवसेनेच्या राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे, कल्याणचे शिवसेना पदाधिकारी सुमेध हुमणे, भारत-श्रीलंकेचे मान्यवर आणि बौद्ध भिक्खूगण सहभागी झाले होते.Pudhari
Published on: 
Updated on: 

Dr Babasaheb Ambedkar Statue Biyagama Sri Lanka

डोंबिवली : भारत आणि श्रीलंका या दोन देशांमधील आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांना नव्या उंचीवर नेणाऱ्या एका महत्त्वपूर्ण पर्वाचा नुकताच श्रीलंकेत प्रारंभ झाला आहे. श्रीलंकेतील बियागामा येथे मैत्री सेतू शैक्षणिक व सांस्कृतिक संकुलाचा भूमिपूजन सोहळा अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात पार पडला आहे. या ऐतिहासिक प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या संकुलात श्रीलंकेच्या इतिहासात प्रथमच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे.

 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून शिवसेनेच्या पुढाकाराने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे. या दिमाखदार भूमिपूजन सोहळ्यासाठी शिवसेनेच्या राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कल्याणमधील शिवसेनेचे पदाधिकारी सुमेध हुमणे यांच्यासह भारत आणि श्रीलंकेचे उच्चायुक्त व दोन्ही देशांतील इतर अनेक मान्यवर मंडळी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित होती.

Dr Babasaheb Ambedkar Statue Biyagama Sri Lanka
India vs Sri Lanka: इशान-वैभवचा धमाका.. टीम इंडिया सुवर्ण पदकापासून एक पाऊल दूर, लंकेचा उडवला धुव्वा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीलंकेतील बौद्ध पुनरूज्जीवनाचे प्रणेते अनागारिक धम्मपाल या दोन्ही महान युगपुरुषांच्या विचारांचा, कार्याचा आणि समृद्ध वारशाचा परिचय नव्या पिढीला करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. मैत्री सेतू संकुलाच्या माध्यमातून या दोन्ही देशांदरम्यान शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाण-घेवाणीला मोठी चालना मिळणार आहे.

भारत-श्रीलंका मैत्रीचे बंध अधिक दृढ होण्यास मदत होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील बंधुता, सौहार्द आणि सांस्कृतिक एकात्मतेचा नवा अध्याय लिहिणारा हा उपक्रम दोन्ही देशांच्या राजकीय व सामाजिक संबंधांमध्ये एक ऐतिहासिक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.