Shrikant Shinde Politics: ‘खुमखुमी असेल तर कल्याण-ठाणे लोकसभेत उभे रहा’; डॉ. श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईकांना खुले आव्हान

महाशिवरात्री निमित्त अंबरनाथ येथे पत्रकार परिषदेत थेट इशारा; युतीतील वाद पुन्हा चिघळला
Shrikant Shinde Politics
Shrikant Shinde PoliticsPudhari
Published on
Updated on

अंबरनाथ/कल्याण : वयाप्रमाणे काही आजार होत असतात. तसा स्मृतीभ्रंशचा आजार गणेश नाईकांना झाला आहे. त्यामुळे विसरभोळेपणा, मागच्या गोष्टी आठवणीत न राहणे, दिशाभूल होणे, व्यक्तिमत्त्वांमध्ये बदल होणे अशी लक्षणे दिसतात. हे मी का सांगू शकतो कारण मी एक डॉक्टर आहे. तरी खुमखुमी पूर्ण करायची असेल तर कल्याण, ठाणे कोणत्याही लोकसभेत उभे राहा. असे खुले आव्हान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना दिले. इतकेच नाही तर शिंदे साहेबांच्या नादाला लागा पण श्रीकांत शिंदेच्या नादाला लागू नका असा थेट इशारा देखील त्यांनी नाईक यांना दिला. महाशिवरात्री निमित्ताने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे अंबरनाथ च्या प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

Shrikant Shinde Politics
Konkan Tourism : मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेसाठी एप्रिलचा मुहूर्त

ते पुढे म्हणाले, श्रीकांत शिंदेला माजी करण्याची भाषा गणेश नाईकांनी केली पण त्यांना आजारपणामुळे काही आठवत नाहीये. त्यांच्या घरामध्येच दोन मुलं आणि ते स्वतः माजी झाले आहेत. शिंदे साहेबांवर ते टीका करतात. पण एका नवख्या आनंद परांजपे सारख्या उमेदवाराला त्यांच्या मुलासमोर शिंदे साहेबांनी जिंकून आणलं होतं. इतकच नाही तर मुलाचा राजकीय बळी स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी घेतला. त्यामुळे शिंदे साहेबांना किंवा मला माजी करण्याची भाषा त्यांनी करू नये. माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या महापालिका आणि नगरपालिकेमध्ये तसेच ठाणे महापालिकेमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. तरी जास्त खुमखुमी असेल तर माझ्या कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा कुठेही उभे रहा माझं ओपन चॅलेंज आहे. तुमच्यासमोर श्रीकांत शिंदे उभा राहील. आणि माझं महायुतीच्या नेत्यांना देखील एक सांगणं आहे की, पुढील निवडणुकीत यांची खुमखुमी यांना पूर्ण करू देत. असे आव्हान ही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.

Shrikant Shinde Politics
Dombivli Fire | डोंबिवलीत भल्या पहाटे उसळला आगडोंब : सोसायटीच्या आवारातील २९ दुचाक्या जळून खाक; ५ जण जखमी

वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने युतीमध्ये एकत्र असताना देखील ते एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीयेत. त्यामुळे भविष्यात या वादाचे पडसाद पुन्हा कसे उमटतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Shrikant Shinde Politics
Panvel Auto Driver Robbery: कर्जफेडीसाठी प्रवासी महिलेवर चाकू हल्ला; 48 तासांत रिक्षाचालक अटकेत

खासदारांकडून शिवलिंगाला दुग्धाभिषेक

महाशिवरात्री निमित्त कल्याण लोकसभा मतदार संघातील अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरा सह डोंबिवलीतील खिडकाळेश्वर मंदिर, मानपाडेश्वर मंदिर व पिंपळेश्वर शिवमंदिरांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भेट देत त्यांनी शिव मंदिरात शिवलिंगाला दुग्धाभिषेक करत महादेवाचे दर्शन घेतले. डोंबिवलीतील पिंपळेश्वर शिवमंदिरातील शिवलिंगाची पूजा अर्चा करून मनोभावे पूजा केल्या नंतर पत्रकारांशी संवाद साधला असता खासदार शिंदे यांनी शिवमंदिर कॉरिडॉर विकास कामाचा उल्लेख केला. देशाच्या विविध राज्यातून भाविक हे शिवमंदिर आणि शिवमंदिर कॉरिडोर पाहण्यासाठी येतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी मंत्री गणेश नाईक यांचा देखील खरपूस भाषेत समाचार घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news