Dombivli Fire | डोंबिवलीत भल्या पहाटे उसळला आगडोंब : सोसायटीच्या आवारातील २९ दुचाक्या जळून खाक; ५ जण जखमी

सांगाव येथील रविकिरण सोसायटीतील राज अपार्टमेंटच्या बेसमेंटमधील दुर्घटना
29 Bikes Burnt Dombivli
राज अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये पार्क केलेल्या २९ दुचाक्या जळून खाक झाल्या, आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाचे जवान Pudhari
Published on
Updated on

29 Bikes Burnt Dombivli

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडे मानपाडा रोडला असलेल्या सांगाव येथील रविकिरण सोसायटीतल्या राज अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास अचानक आगडोंब उसळला. या आगीमध्ये सोसायटीच्या आवारात पार्क केलेल्या २९ दुचाक्या जळून खाक झाल्या. तर एकीकडे आग लागल्यानंतर झालेल्या धावपळीत, तर दुसरीकडे आपल्या दुचाक्या विझविण्याचा प्रयत्नात असलेले ५ रहिवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

सुमन रावत (४४), सौरभ रावत (१९) आणि गर्व रावत (२१) या तिघांना ऑप्टिलाईट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेली गीता सावंत (४५) हिला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर आगीच्या दरम्यान उडी मारल्यामुळे राधेश्याम यादव (२८) हा तरूण किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

29 Bikes Burnt Dombivli
Dombivli Mahashivratri: डोंबिवलीत बर्फातून साकारणार पाच दिव्य शिवलिंग प्रतिकृती

सांगाव (चेरानगर) परिसरात जय भारत स्कूलजवळ रविकिरण सोसायटीतल्या राज अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये रविवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास अचानक आग लागली. या बेसमेंटमध्ये सदर सोसायटीतील रहिवासी त्यांच्या स्कूटर आणि मोटारसायकली पार्क करतात. बेसमेंटमध्ये अचानक आग लागताच सर्वत्र धूर पसरला. हा~~हा म्हणता आगीने रौद्र रूप धारण केले.

भल्या पहाटेच्या सुमारास आग लागल्यानंतर सोसायटीतील भयभीत रहिवासी जागे होऊन बाहेर पडले. आगीचे रौद्ररूप पाहून आजुबाजुच्या इमारतींमधील देखिल रहिवासी घाबरले होते. काहींच्या घरात धूर पसरला. हे पाहून रहिवाशांनी घराबाहेर पळ काढला. सर्वत्र धूर पसरल्याने सुरूवातीला काही कळत नव्हते. काहींनी पाण्याचा मारा करण्याचा प्रयत्न केला.

29 Bikes Burnt Dombivli
Dombivli Crime | डोंबिवलीत महिलेवर हल्ला, विनयभंग करून पसार झालेल्या दुचाकीस्वाराचा शोध सुरू

तर दुसरीकडे या धावपळीत ५ जण जखमी झाले. अग्निशामक दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आग विझवल्यानंतर रहिवाशांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. ही आग इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक कयास आहे. मात्र या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. आग लागली की लावली ? याचा चौकस मानपाडा पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news