Sahar Shaikh New Dialogue: ‘कैसे हराया’नंतर सहर शेखचा नवा डायलॉग चर्चेत; ‘मैं वहां थूक के निकली हूं…’ म्हणत कुणाला दिला इशारा?

Sahar Shaikh New Viral Dialogue: ठाणे-मुंब्रा येथील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचा नवा डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sahar Shaikh New Dialogue
Sahar Shaikh New DialoguePudhari
Published on: 
Updated on: 

Sahar Shaikh New Viral Dialogue: ठाणे-मुंब्रा परिसरातील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. महापालिका निवडणुकीतील विजयानंतर ‘कैसे हराया’ या डायलॉगमुळे त्या चर्चेत आल्या होत्या. आता त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या व्हिडिओची चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी विरोधकांना उद्देशून केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे.

काय आहे सहर शेख यांचा नवा डायलॉग?

सहर शेख यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या हिंदीतून एक डायलॉग म्हणताना दिसत आहेत. त्यात त्या म्हणतात, “मेरी बुराई के अखबार बांट रहे हो। मेरे साथ रहकर मुझे ही काट रहे हो। मैं वहां थूक के निकली हूं जहां तुम चाट रहे हो।”

पुढे त्या म्हणतात, “तो यह जो तुम्हारा तरीका है काम करने का, अगर तुमको लगता है कि यह काम है तो किसी को डुबाकर तुम खुद ऊपर कभी भी नहीं आ पाओगे। यह मेरा मैसेज है उन लोगों के लिए।”

या वक्तव्याचा रोख विरोधकांवर असल्याचे दिसते. दुसऱ्याला खाली खेचून स्वतः पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांनी हा इशारा दिला आहे. त्यांच्या या नव्या डायलॉगची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Sahar Shaikh New Dialogue
Sanjay Raut Dussehra Rally: एप्रिल २०२७ मध्ये मोदी-शहा सत्तेतून पायउतार होतील; संजय राऊतांचा दावा

‘कैसे हराया?’ डायलॉगनंतर पुन्हा चर्चेत

ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक ३० मधून निवडून आल्यानंतर सहर शेख यांनी केलेल्या भाषणाची मोठी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी विरोधकांना उद्देशून ‘कैसे हराया’ असा डायलॉग म्हणला होता. तसेच मुंब्रा हिरवा करण्याबाबत केलेल्या विधानामुळेही त्या चर्चेत आल्या होत्या.

Sahar Shaikh New Dialogue
Gold Silver Price Today: सोन्याचे भाव घसरले, चांदीही स्वस्त! आता खरेदी करावी की आणखी घसरणीची वाट पाहावी?

त्यानंतर आता नव्या डायलॉगमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. सोशल मीडियावर राजकीय नेत्यांची भाषणे आणि त्यांचे डायलॉग अनेकदा व्हायरल होतात. सहर शेख यांच्या नव्या व्हिडिओबाबतही अशीच चर्चा सुरू झाली आहे.

कोण आहेत सहर शेख?

सहर शेख यांचे पूर्ण नाव सहार युनूस शेख असे आहे. त्या मुंब्रा परिसरातील राजकारणातील चर्चेत असलेल्या युवा चेहऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून २०१७ मध्ये बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम) ही पदवी घेतल्याची माहिती आहे. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, त्यांचा कार वॉशिंग सेंटरचा व्यवसाय आहे.

निवडणुकीनंतरचा ‘कैसे हराया?’ हा डायलॉग असो किंवा आता समोर आलेला नवा व्हिडिओ, त्यांच्या वक्तव्यांची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news