Monsoon Update: कोकणासह उर्वरित महाराष्ट्रात 'या' तारखेपासून जोरदार पाऊस

मान्सूनची सकारात्‍मक स्थिती
Monsoon Update
Monsoon Update (File Photo)
Published on
Updated on

ठाणे: एल निनोमुळे कोकणात भातलागवडीचा प्रश्न जिकीरीचा झाला असताना आणि जून महिना विनापावसाचा गेला असताना पावसाची आनंदवार्ता समोर आली आहे. २३ जूनपासून पाऊस कोकणात दाखल होईल अशी सकारात्‍मक मान्सूनची स्थिती पहायला मिळत आहे.

मंगळवार, २३ जूनपासुन मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्मितीची शक्यता असुन तेथे सध्या पूर्वमोसमी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. वेंगुर्ला, देवगड, दापोली या भागात मान्सून पोाहोचला आहे. आणि मान्सूनच्या सरींना चालना मिळू शकते.

Monsoon Update
Snakehead Fish: धरमतर खाडीत 'मरळ' माशांचा सुळसुळाट; पारंपरिक मासे धोक्यात, पण अर्थार्जनाची मोठी संधी

कोकणात भातशेती ९० टक्के भागात केली जाते. त्‍यामुळे कोकणाला भाताचे कोठार असेही म्हणतात. कोकणातील वाडा कोलम ही भाताची जात सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र भातशेतीला ६० दिवस ते ९० दिवस हा कालावधी लागत असल्याने मान्सून लांबल्याने भातशेती संकटात आली आहे. त्‍यामुळे बळीराला पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. अशा स्थितीत पावसाचे शुभवर्तमान आले आहे. त्यामुळे खरिपाच्या कामांना वेग येणार आहे.

मुंबईत मान्सूनचे आगमन कधी?

मागील २०१९ व २०२३ अशा एल-निनोच्या गत दोन वर्षात, मुंबईत मान्सूनचे २५ जूनला म्हणजे त्याच्या सरासरी ११ जून या तारखेपासून तब्बल १४ दिवसांनी उशिरा आगमन झाले होते. यावर्षीही एल-निनोचे वर्ष आहे, आणि अद्याप मुंबईत मान्सून पोहोचला नाही. २०२६ च्या एल-निनो वर्षात सुद्धा मान्सूनचे गुरुवार, २५ जूनला मुंबईत आगमनाची शक्यता निर्माण झाली आहे.

जोरदार मान्सूनची हजेरी मुंबईसह कोकणात कधी?

गुरुवार,. २५ जून ते बुधवार १ जुलै दरम्यानच्या जुनच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार मान्सूनची शक्यता ही कायम आहे.

Monsoon Update
Pali Nagarpanchayat Election: पाली न.पं. पोटनिवडणुकीत शिवसेनेचा दणदणीत विजय; प्रभाग १३ मध्ये स्वप्नाली जाधव विजयी

मुंबईतील दिवसाच्या दमट व रात्रीच्या उकाड्यापासुन मुंबईकरांना दिलासा कधीपासून मिळू शकतो. शनिवार, २० जून पासूनच वातावरण बदलास सुरवात झाली आहे. मुंबईकरांना दिवसाच्या दमटपणा व रात्रीच्या उकाड्यापासुन काहीसा दिलासा मिळू शकतो, असे वाटते. रायगड जिल्ह्‌यात काही ठिकाणी पावसाच्या सरी होत आहेत.

उर्वरित महाराष्ट्रात मान्सून कधी?

मुंबईतील मान्सूनच्या आगमनानंतर म्हणजे जुनच्या शेवटच्या आठवड्यात खान्देश, नाशिक अ. नगर, पुणे सातारा कोल्हापूर व पश्चिम मराठवाड्यातील जिल्ह्यात मान्सून च्या पावसाची शक्यता जाणवते. पूर्व मराठवाडा व विदर्भात मात्र जुलै पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात मान्सूनच्या पावसाची शक्यता जाणवते. तत्पूर्वी तुरळक ठिकाणी किरकोळ पूर्वमोसमी पावसाची शक्यता जाणवते.

मुंबई, ठाणे, रायगडात पाणीटंचाईचे ढग गडद?

एल- निनो चे वर्ष व आजपावेतो कोकणात ८१ टक्के कमी झालेला पाऊस असे जरी असले तरी मान्सूनच्या उर्वरित १३० दिवसाच्या कालावधीतून म्हणजे आजपासून साधारण २० ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, रायगडसह कोकणात मान्सूनच्या पावसातून मुंबई, ठाणे, रायगडातील तळी व धरणांचे असलेले जाळे यातून मुंबई, ठाणे, रायगड, कोकणकरांची वर्षभराची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटू शकते, असे वाटते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news