Thane News : दुचाकीस्वार रणरागिणीने केले 10 दिवसांत 12 किल्ले सर

एकूण 4 हजार 154 किलोमीटर अंतर दुचाकीवरून केले पार
women biker achievement
दुचाकीस्वार रणरागिणीने केले 10 दिवसांत 12 किल्ले सरpudhari photo
Published on
Updated on

डोंबिवली : अभिमानासाठी स्वार व्हा - किल्ले वाचवा, इतिहास वाचवा हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान मिळवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गौरवशाली किल्ल्यांच्या पवित्र प्रवासाला निघताना केवळ दुचाकीच्या थ्रोटलने नाही तर महाराष्ट्राच्या मातीच्या हृदयाच्या ठोक्याने स्वार होत दुचाकीस्वार रणरागिणी रश्मी परब यांनी 10 दिवसांत तब्बल 12 किल्ले सर केले आहेत.

प्रत्येक किल्ला शौर्य, दूरदृष्टी आणि सदगुणांचे जिवंत मंदिर म्हणून उभा आहे. जो स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या महान मराठा योद्ध्याच्या आत्म्याचे प्रतिध्वनी करतो. हे फक्त दगड आणि तटबंदी नाहीत तर ते धैर्य, शिस्त आणि दैवी उद्देशाचे मूक ग्रंथ असल्याच्या भावना रश्मी परब हिने व्यक्त केल्या. ही स्वारस्य यात्रेपेक्षा जास्त आहे - ती एक तीर्थयात्रा आहे.

women biker achievement
Palghar Crime : नालासोपाऱ्यात क्षुल्लक कारणावरून मित्राची हत्या

आपला इतिहास, वारसा आणि आपला अभिमान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपले सामूहिक कर्तव्य जागृत करण्याचे आवाहन या मोहिमेद्वारे हा संदेश पसरविण्याचे उद्दिष्ट रश्मी परब यांनी ठेवले होते. किल्ले वाचवा, इतिहास वाचवा, कारण जेव्हा आपले किल्ले मरतात तेव्हा आपली ओळख त्यांच्यासोबत मिटते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद प्रत्येक मैलावर मार्गदर्शन करत आणि इंजिनच्या प्रत्येक गर्जनेने गुंजत राहोत, अशा भावना 12 किल्ले सर करताना रश्मी परब यांनी व्यक्त केल्या.

कोण आहे ही रणरागिणी?

दुचाकीस्वार रश्मी परब (53) या रणरागिणीने आपल्या रॉयल इनफिल्ड ( 4 350) द्वारे किल्ले वाचवा, इतिहास वाचवा, या उद्दिष्टाने युनोस्कोच्या जागतिक वारसा मिळालेल्या छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी ही तीर्थयात्रा समजून फक्त 10 दिवसांत पूर्ण केली. 22 फेब्रुवारी रोजी तिने ठाण्यातून सुरू केलेली स्वराज्य समर्पित तीर्थ/स्वारस्य यात्रा 4 मार्च रोजी ठाण्यात येऊन समाप्त केली. यासाठी एकूण 4 हजार 154 किलोमीटर अंतर त्यांनी दुचाकीवरून पार केले.

विशेष म्हणजे तिने हे रायगडसह सर्व किल्ले पायी चढून त्यांची पाहणी केली. नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्यापासून सुरुवात करून खांदेरी, लोहगड, शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि शेवटी तामिळनाडूमधील जिंजी किल्ल्यावर स्वार होऊन त्या ठाण्यात सुखरूप परत आल्या.

women biker achievement
Thane MD seizure : ठाण्यातून चार कोटींचे एमडी जप्त; तीन अटकेत

लवकरच इंडिया रेकॉर्डस्‌‍ ऑफ बुकमध्ये नोंद

रश्मी परब या मुंबईतील परेल व्हिलेज येथे राहत असून त्यांनी यापूर्वी अष्टविनायक (12 तास 29 मिनिट), महाराष्ट्रातील तीन ज्योतिर्लिंगे (11 तास 15 मिनिट) अशा यात्रा त्यांनी आपल्या दुचाकीने रेकॉर्ड नोंदवून यशस्वीपणे पार केल्या आहेत. याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होऊन त्यांना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले होते. शिवाय खडतर असा लडाख प्रवास देखील दुचाकीवरून पूर्ण केला आहे.

युनोस्केच्या वारसा मिळेलेल्या 12 किल्ल्यांची यात्रा रश्मी परब यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. आता इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून त्याची खातरजमा व तपासणी केली जाईल. त्यानंतर त्यांची नोंद इंडिया रेकॉर्ड्स ऑफ बुकमध्ये लवकरच होईल अशी आशा व्यक्त करून डोंबिवलीकर सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी रश्मी परब यांचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news