Palghar Crime : नालासोपाऱ्यात क्षुल्लक कारणावरून मित्राची हत्या

फरार आरोपीला काही तासात अटक
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

वसई : तुळींज पोलीस ठाणे हद्दीतील मोरेगाव परिसरात मंगळवारी उशिरा रात्री दोन युवकांमध्ये दारू पिल्यानंतर झालेल्या वादातून एका युवकाने दुसऱ्या युवकावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. आणि घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

मयत शुभम तिवारी (30) हा नालासोपारा पूर्वेच्या मोरेगाव येथील जिजाई नगरमध्ये मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्र पिंटू ठाकूर याच्यासोबत मद्यपान करत होता. दरम्यान, दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.

Crime News
Palghar Gram Panchayat strike : जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

या वादातून संतापलेल्या पिंटू ठाकूरने शुभमच्या डोक्यावर व गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. शुभम रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी पिंटू फरार झाला होता. बुधवारी दुपारी तुळिंज पोलिसांनी आरोपीला नालासोपाऱ्यातून अटक केली आहे. ठाकूर विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Crime News
Palghar News : पालघर शहरात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news