Thane MD seizure : ठाण्यातून चार कोटींचे एमडी जप्त; तीन अटकेत

नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल
Thane MD seizure
ठाण्यातून चार कोटींचे एमडी जप्त; तीन अटकेतpudhari photo
Published on
Updated on

ठाणे : नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चरई परिसरात एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघा ड्रग्ज पेडलर्ससह त्यांच्या साथीदारास ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने 23 मार्च रोजी सायंकाळी अटक केली आहे. अटकेतल्या आरोपींच्या ताब्यातून 4 कोटी 12 लाख 40 हजार रुपये किमतीचे 2 किलो 62 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील चरई परिसरात दोन जण एमडी ड्रग्ज विक्री करण्यास येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार गिरीश पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने 23 मार्च रोजी सायंकाळी 7.10 वाजेच्या सुमारास सापळा लावून सोहेल दिलीप खान (26, रा. कोपरी, ठाणे) आणि रोहित विलास सितापुरे (21, उल्हासनगर) या दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यात एकूण 2 किलो 62 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज आढळून आले.

Thane MD seizure
Thane Crime : गावदेवी मंडईत भाजीविक्रेत्यावर हल्ला

4 कोटी 12 लाख 40 हजार रुपये किमतीचे हे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले. दोघांच्या चौकशीतून त्यांच्या आणखी एका साथीदाराचे नाव समोर आले. त्यातर पोलिसांनी तिसरा आरोपी राजेश हडावले (23, कोपरी, ठाणे) यास देखील अटक केली. आरोपींना न्यायालयाने 28 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी कोठून आणले गेले याचा तपास ठाणे अमली पदार्थ विरोधी पथक करीत आहे.

Thane MD seizure
Ulhasnagar Municipal Corporation budget : उल्हासनगर महापालिकेचा 997 कोटींचा समतोल अर्थसंकल्प

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news