

कल्याण: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा २८ व २९ नोव्हेंबर रोजी कल्याण-डोंबिवलीला दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात मनसेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांशी साधणार थेट संवाद साधणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवार २८ नोव्हेंबर आणि रविवार २९ नोव्हेंबर रोजी कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर येणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान शनिवार २८ तारखेला सायंकाळी ४ वाजता डोंबिवली पूर्व येथील प्रगती कॉलेज हॉल, दत्तनगर चौक येथे पक्षाचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर रविवारी सकाळी १० वाजता कल्याण येथे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांची बैठक पार पडणार आहे.
या दोन्ही बैठकांमध्ये राज ठाकरे उपस्थित पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. यावेळी पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी राजकीय व संघटनात्मक नियोजन, स्थानिक प्रश्न तसेच पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.
कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांतील पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेणे, पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांशी थेट संवाद साधणे आणि आगामी काळातील पक्षाची दिशा व रणनीती निश्चित करणे, या दृष्टीने राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे अशी माहिती मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष हर्षद हरिश्चंद्र पाटील यांनी दिली.