Police recruitment fraud case : पोलीस भरतीत उत्तेजक इंजेक्शन घेणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

उमेदवारावर गुन्हा दाखल करत भरती प्रक्रियेतून केले बाद
Police recruitment fraud case
पोलीस भरतीत उत्तेजक इंजेक्शन घेणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात Pudhari
Published on
Updated on

मिरा रोड ः मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत सुरू असलेल्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मैदानी चाचणीत चांगली कामगिरी करण्यासाठी शरीरात इंजेक्शनद्वारे उत्तेजक द्रव्य टोचणाऱ्या एका उमेदवाराला अंमली पदार्थ तपासणी पथकाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला भरती प्रक्रियेतून तत्काळ बाद करण्यात आले आहे.

भाईंदर पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात सध्या पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरू आहे. 23 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 2500 उमेदवारांना चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. पहाटे 5 वाजल्यापासून उमेदवारांची तपासणी करून त्यांना प्रवेश दिला जात होता. यादरम्यान, अंमली पदार्थ तपासणी पथकाचे कर्मचारी साध्या वेशात मैदानावर गस्त घालत होते. 100 मीटर धावण्याच्या ट्रॅकसमोर असलेल्या बिस्कीट आणि ग्लुकोजच्या तंबूच्या मागे साहिल शंकर अवघडे (23 ) रा. बारामती, जि. पुणे हा संशयास्पद हालचाली करताना आढळला.

अधिक निरिक्षण केले असता, तो स्वतःच्या हाताच्या दंडामध्ये इंजेक्शनद्वारे उत्तेजक द्रव्य टोचताना पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी संबंधित उमेदवाराला ताब्यात घेऊन त्याची सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. तपासात त्याने उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले.

Police recruitment fraud case
Child trafficking crime : पोटच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले

त्याच्यावर औषधीद्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियमासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट व्यवस्था केली आहे. संपूर्ण मैदान सीसीटीव्हीच्या निगराणीत असून 69 हँडीकॅम पथके तैनात आहेत. 20 पोलीस अंमलदारांचे विशेष पथक आणि साध्या वेशातील दोन फिरती पथके सतत नजर ठेवून आहेत. मैदानावर डॉक्टरांचे पथकही तैनात करण्यात आले आहे.

Police recruitment fraud case
Ambarnath municipal budget : अंबरनाथ नगरपालिकेचा कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प

शारीरिक चाचणी दरम्यान कोणत्याही उमेदवाराने उत्तेजक द्रव्ये किंवा अंमली पदार्थांचे सेवन करू नये. अशा प्रकारचा गैरमार्ग अवलंबल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि उमेदवाराला कायमचे बाद केले जाईल. उमेदवारांनी आपल्या कौशल्यावर आणि मेहनतीवर विश्वास ठेवावा असे आवाहन अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news