Ambarnath municipal budget : अंबरनाथ नगरपालिकेचा कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प

739 कोटींचा शिलकी अर्थसंकल्प; निव्वळ उत्पन्न 261 कोटी रुपये
Ambarnath municipal budget
अंबरनाथ नगरपालिकेचा कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्पpudhari photo
Published on
Updated on

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेने सन 2026-27 या आर्थिक वर्षातील 739 कोटी रुपयांचा व 42 लाख रुपये शिलकी अर्थसंकल्प नगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत मंजूर करण्यात आला. नरपालिकेचा हा आर्थिक डोलारा शासनाच्या अनुदानावर उभा आहे. शासनाचे अनुदानाचे आर्थिक पाठबळ वजा केले तर अंबरनाथ नगरपालिकेचे स्वतःचे निव्वळ उत्पन्न अवघे 261 कोटी रुपये असल्याने, स्वतःचे आर्थिक स्रोत निर्माण करण्याकडे नगरपालिकेने पुन्हा एकदा दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे.

अंबरनाथ नगरपालिकेची स्वतःची आर्थिक मदार ही घरपट्टी, नगर रचना विभाग, बाजार विभाग या प्रमुख तीन विभागांवर आहे. मागील काही वर्षात अंबरनाथ नगरपालिकेला राज्य शासनाने भरभरून अनुदान दिल्याने स्वतःच्या उत्पन्न वाढीकडे लक्ष देण्याची गरज नगरपालिकेला भासली नाही. नवनवीन उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध असतानाही ते निर्माण करण्याची आवश्यकता नगरपालिकेला वाटली नाही. त्यामुळे शासनाने अनुदान देणे बंद केले तर नगरपालिकेची अवस्था ना घर का, ना घाट का? अशी होईल.

Ambarnath municipal budget
Thane News : मिरा-भाईंदरमधील क्लस्टरचे मंजूर 24 आराखडे रद्द

शिक्षणासाठी भरीव निधी

शिक्षणाच्या अनुषंगाने भरून निधी मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी दहा कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी 18 कोटी रुपये, महिला व बालकल्याण विभागासाठी चार कोटी

अपंग पुनर्वसन आणि अर्थसहाय्यासाठी चार कोटी, कर्मचाऱ्यांना समुग्रह अनुदनासाठी एक कोटी 20 लाख रुपये, भुयारी गटात बांधणे, गटार बांधणे आणि नाले बांधणे यासाठी 12 कोटी रुपये, स्मशानभूमीच्या बांधकामासाठी तीन कोटी रुपये, शहरातील आरक्षण हे विकसित करण्यासाठी पाच कोटी रुपये, सीसीटीव्ही बसवण्यासाठी पाच कोटी रुपये, पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत घनकचरा आणि पर्यावरण पूरक प्रकल्पासाठी 13 कोटी रुपये

नगरपालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत

  • मालमत्ता करातून वसुली 93 कोटी

  • शासनामार्फत कर स्वरूपात आलेली रक्कम 15 कोटी

  • शासकीय अनुदाने व अर्थसहाय्य 88 कोटी

  • नगर परिषदेच्या मालमत्तांतून भाडे स्वरूपात येणारे उत्पन्न एक कोटी 70 लाख

  • नगर रचना विभाग शुल्क आणि इमारत बांधकाम परवानगी स्वरूपात आलेला विकास निधी 28 कोटी

  • इतर उत्पन्नाच्या स्वरूपातून 15 कोटी असे एकूण 261 कोटी रुपयांचे उत्पन्न दर्शवण्यात आले आहे.

Ambarnath municipal budget
High temperature 3D printing : उच्च तापमानातील 3 D प्रिंटिंगचा अंदाज आता अचूक कळणार

खर्च

  • भुयारी गट दुरुस्ती तीन कोटी रुपये

  • नालेसफाईसाठी एक कोटी रुपये

  • चौक सुशोभीकरण चार कोटी रुपये

  • खोदलेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी पाच कोटी रुपये

  • सार्वजनिक शौचालयाची देखभाल दुरुस्ती दीड कोटी रुपये

  • पथदिव्यांचे देखभाल दुरुस्तीसाठी साडेचार कोटी

  • पालिकेच्या इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news