Navratri 2026: यंदा नवरात्री नव्हे ‘दशरात्री’! यावर्षी शारदीय नवरात्र ११ ॲाक्टोबरला, तर २० रोजी दसरा

१७ आणि १८ ऑक्टोबरला सप्तमी तिथीची वृद्धी; २० ऑक्टोबरला अपराण्ह व प्रदोषकाली दशमी
Navratri 2026
Navratri 2026Pudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: आश्विन शुक्ल सप्तमी तिथी लगतच्या दोन दिवस सूर्योदयाला आल्याने १७ आणि १८ ऑक्टोबर अशी सप्तमी तिथीची वृद्धी झाल्याने यंदा दहा दिवसांची नवरात्र आहे.

मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी अपराण्हकाली आणि प्रदोषकाली दशमी असल्याने त्याच दिवशी नवरात्रौत्थापन व विजयादशमी दसरा असल्याची माहिती प्रसिद्ध पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

यावर्षी शारदीय नवरात्र रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सुरू होत असून मंगळवार, २० ॲाक्टोबर रोजी दसरा आहे. यंदाच्या नवरात्रौत्सवात सप्तमी तिथी वृद्धी झाली असल्याने नवरात्र दहा दिवसांची झाले आहे.

गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी, शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सरस्वती पूजन आहे. रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी श्री महालक्ष्मी पूजन करावयाचे आहे. १९ ऑक्टोबर रोजी महाष्टमी उपवास आणि महानवमी उपवास असून १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०-२७ ते ११-१५ या कालावधीत संधिकाल पूजन करता येईल, अशी तिथीची विधिवत माहिती सोमण यांनी दिली.

Navratri 2026
Ritu Tawde Case: रितू तावडे यांना सत्र न्यायालयाने ठोठावला 1 हजार रुपयांचा दंड; शिक्षक मारहाण प्रकरणी सुनावणीस गैरहजर राहणे भोवले

निर्मिती आणि आदिशक्तीचे पूजन

आश्विन महिना हा शरद ऋतूमध्ये येतो. या कालावधीत शेतात तयार झालेले धान्य हे घरात येत असते. शेतात तयार झालेले धान्य आश्विन महिन्यात घरात येते म्हणून शारदीय नवरात्रात आपण निर्मिती शक्तीची, आदिशक्तीची पूजा करतो.

Navratri 2026
Salim Dola Case: सलीम डोलाच्या ड्रग्ज नेटवर्कला मोठा धक्का! मेफेड्रोन तस्करी प्रकरणात दोघांना ईडी कोठडी

नऊ अंकाचे व निर्मितीशक्तीचे अतूट नाते

या निर्मितीशक्तीची - आदिशक्तीची पूजा नऊ दिवस का करतो? असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. नऊ ही ब्रह्मसंख्या आहे. या अंकाचे आणि निर्मितीशक्तीचे अतूट नाते आहे. बियाणे जमिनीत पेरले की नऊ दिवसांनी अंकुरते.

गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने, नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. म्हणून निर्मितीशक्तीची-आदिशक्तीची पूजा नऊ दिवस केली जाते. शरद ऋतूतील या नऊ दिवसांच्या उपासनेलाच ‘शारदीय नवरात्र' संबोधतात, असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news